अखेर 60 तासानंतर ‘सिंधू साधना’ बंदरात

भरकटलेल्या जहाजातील 36 जण सुखरूप, भारतीय तटरक्षक दलाला यश
Indian Coast Guard
Indian Coast GuardDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Coast Guard इंजिनमध्ये बिघाड झाल्याने कारवार किनारपट्टीच्या दिशेने भरकटलेल्या राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेच्या (एनआयओ) ‘सिंधू साधना’ हे संशोधन जहाजावरील ३६ जणांना सुमारे ६० तासांच्या अथक परिश्रमानंतर भारतीय तटरक्षक दलाने सुखरूपपणे काल मध्यरात्री मुरगाव बंदरात आणले.

एनआयओचे ‘सिंधू साधना’ हे संशोधन जहाज समुद्रात नादुरुस्त झाल्याने ते ताशी तीन सागरी मैल वेगाने कारवारच्या किनारपट्टीकडे वाहत चालले असल्याचा संदेश भारतीय तटरक्षक दलाला बुधवारी दुपारी एकच्या दरम्यान मिळाला.

सिंधू साधना हे एनआयओचे एक अत्याधुनिक संशोधन जहाज आहे. या जहाजावरून मौल्यवान वैज्ञानिक उपकरणे व संशोधन डेटा नेण्यात येत होता. परंतु ते समुद्रात नादुरुस्त झाले आणि संकटात सापडले. या जहाजावर आठ शास्त्रज्ञांसह ३६ जण होते.

Indian Coast Guard
Mapusa Crime News: बॉक्सर युवतीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी संशयिताला तीन दिवसांची कोठडी

या मोहिमेमध्ये भारतीय तटरक्षक दलाच्या ‘सुजीत’ व ‘वराह’ या दोन जहाजांनी मोठी कामगिरी बजाविली. नादुरुस्त झालेल्या ‘सिंधू साधना’ जहाजाला घेऊन ‘सुजीत’ जहाज २८ रोजी मध्यरात्री एकच्या दरम्यान मुरगाव बंदरातील क्रूझ टर्मिनलवर पोचले.

भारतीय तटरक्षक दलाने जलद व कार्यक्षम प्रतिसाद देऊन ३६ जणांचे जीव वाचविले. सदर मोहीम खडतर होती. पण तशाही परिस्थितीत सिंधू साधनापर्यंत पोचविण्याची कामगिरी भारतीय तटरक्षक दलाने केली.

Indian Coast Guard
Mapusa News: सीसीटीव्हीबरोबरच प्रकाश व्यवस्थेत सुधारणा करा, व्यापाऱ्यांची मागणी

अथक परिश्रम : सुमारे 60 तासांच्या अथक परिश्रमानंतर भारतीय तटरक्षक दलाने सुखरूपपणे काल मध्यरात्री मुरगाव बंदरात आणले. त्यानंतर ते गोव्याच्या दिशेने निघाले. यावेळी अनेक अडथळे निर्माण झाले.

दोरखंड तुटण्याचे प्रकार घडले. जहाजावरील सर्व शास्त्रज्ञ व इतर कर्मचारी सुरक्षित आहेत. भारतीय तटरक्षक दलाच्या जलद प्रतिसाद आणि धोरणात्मक समन्वयाने मानवी जीवन आणि पर्यावरण या दोहोंचे संरक्षण करण्यासाठी त्यांची अतूट बांधीलकी पुन्हा एकदा सिद्ध झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com