Mapusa News: सीसीटीव्हीबरोबरच प्रकाश व्यवस्थेत सुधारणा करा, व्यापाऱ्यांची मागणी

पोलिस व मार्केटातील व्यापाऱ्यांच्या बैठकीत मागणी
Mapusa News
Mapusa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa News: वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर म्हापसा शहराची सुरक्षा व गुन्हेगारी रोखण्यासाठी महत्त्वाच्या चौकाचौकांत सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करून प्रकाश व्यवस्था सुधारण्यात यावी, अशी मागणी म्हापसा पोलिस व व्यापाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली.

शनिवारी म्हापसा शहरातील व्यापारी वर्ग, ज्वेलर्स तसेच मंदिराच्या पदाधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेत गाऱ्हाणी ऐकून संबंधितांकडून सूचना मागविल्या. पोलीस निरीक्षक सीताकांत नायक यांनी वरील बैठकीला मार्गदर्शन केले.

मागील काही दिवसांपासून म्हापसा शहरात चोरीच्या लागोपाठ तीन घटना घडल्या. मात्र, अद्याप एकाही चोरीचा सुगावा पोलिसांना लागलेला नाही. तसेच येणाऱ्या काळात सणवार व उत्सवांना सुरुवात होत आहे.

अशावेळी पोलिसांकडून व्यापारी वर्ग, मंदिरांच्या व्यवस्थापनाला काय अपेक्षित आहे किंवा सुरक्षेबाबत कुठल्या वेगळ्या उपाययोजना राबवू शकतो यावर साधकबाधक चर्चा झाली.

Mapusa News
Mapusa Crime News: बॉक्सर युवतीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी संशयिताला तीन दिवसांची कोठडी

अलीकडे चोर हे दिवसाढवळ्या चोरी करताहेत. अशावेळी पोलिसांनी दिवसाची गस्त वाढवावी. विशेषतः दुपारच्या सत्रात. त्याचप्रमाणे, रात्रीच्या वेळी मार्केटात काळोख असतो.

त्यामुळे येथील प्रकाश व्यवस्था सुधारण्याकडे लक्ष द्यावे. व्यापाऱ्यांकडून वेळोवेळी म्हापसा पालिकेस पथदीपासंदर्भात निवेदने दिली गेली आहेत, याकडे व्यापाऱ्यांनी लक्ष वेधले.

त्याचप्रमाणे, शहरातील महत्त्वाच्या चौकात किंवा पाँईटवर चांगले सीसीटीव्ही कॅमेरे सीएसआर अंतर्गत उपक्रम राबवून ज्वेलर्स संघटना किंवा इतरांनी पुढाकार घेऊन ते बसवावेत, असे आवाहन पोलीस निरीक्षकांनी केले. यास ज्वेलर्सच्या पदाधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला.

Mapusa News
CM Pramod Sawant: 11 वर्षे बंद असलेल्या खाणी लवकरच सुरू करणार! कामगारांची सुरक्षा जपण्यासाठी सरकार प्रयत्नशील

सतर्कतेची गरज!

  • अशा बैठकींना पालिकेच्या अभियंता किंवा पदाधिकाऱ्यांना बोलवावे. कारण, पालिका ही शहराचा महत्त्वाचा घटक असून चर्चेवेळी त्यांच्या सूचना व अडचणी समजण्यास मदत होईल.

  • पोलिसांनी रात्रीच्या वेळी कोर्ट जंक्शन किंवा गांधी सर्कलवर नाकाबंदी करावी. जेणेकरून, चोरांमध्ये भीतीचे वातावरण राहील.

  • याशिवाय मार्केटमधील काही पालिका मालकीच्या इमारतींच्या मजल्यावर रात्रीच्या वेळी काहीजण बसून जुगार खेळतात किंवा दारू पितात. तिथेही पोलिस गस्त गरजेची आहे.

  • शहरात पुन्हा कथित वेश्याव्यवसाय करणाऱ्यांचा वावर गर्दीच्या ठिकाणी वाढलाय. पोलिसांनी यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली.

  • पोलिसांनी मजूर वर्गाच्या किरायेदार सत्यपान प्रक्रियेवर भर द्यावा व प्रत्येकाकडे पोलिस कार्ड असणे बंधनकारक करावे.

  • मंदिर व्यवस्थापनांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसून या कॅमेऱ्यांचे बॅकअप किमान तीन महिन्यांचे असेल अशी खात्री करुन घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षकांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com