Goa Travel Tips Dainik Gomantak
गोवा

Goa Travel Tips: गोवा ट्रिपचं प्लॅनिंग आहे? कुटुंबासोबत 'असा' करा प्लॅन, सुट्टी होईल अविस्मरणीय!

Goa family trip tips: गोवा हे भारतातील एक असे पर्यटनस्थळ आहे जिथे दरवर्षी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात.

Sameer Amunekar

गोवा हे भारतातील एक असे पर्यटनस्थळ आहे जिथे दरवर्षी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. येथील नयनरम्य समुद्रकिनारे, सजीव नाईटलाइफ, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि पोर्तुगीज वारसा यामुळे गोवा प्रत्येक प्रवाशाची ‘ड्रीम डेस्टिनेशन’ ठरते. जरी हे ठिकाण तरुणांसाठी ‘फ्रेंड्स ट्रिप’ म्हणून प्रसिद्ध आहे, तरीदेखील गोवा हे कुटुंबासह सुट्टी घालवण्यासाठीसुद्धा तितकेच उत्तम आहे. मात्र, अशा सहलीसाठी काही आवश्यक गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.

कुटुंबासह प्रवास करताना योग्य नियोजन केल्यास तुमच्या सहलीत कोणतीही अडचण येणार नाही. हॉटेल बुकिंगपासून ते जेवण, वाहतूक आणि सुरक्षिततेपर्यंत प्रत्येक छोट्या निर्णयाचा तुमच्या ट्रिपवर मोठा परिणाम होऊ शकतो.

गोवा ट्रॅव्हलसाठी 5 महत्त्वाच्या टिप्स

१. वेळेवर हॉटेल बुकिंग करा
गोव्यात टुरिस्ट सीझनमध्ये हॉटेल्सची प्रचंड मागणी असते. जर तुम्ही कुटुंबासोबत प्रवास करत असाल, तर समुद्रकिनाऱ्याजवळील फॅमिली-फ्रेंडली हॉटेल आधीच बुक करा. यामुळे वारंवार लांबचा प्रवास करावा लागणार नाही आणि सहलीचा आनंद अधिक घेता येईल.

२. कुटुंबासाठी योग्य बीच निवडा
गोव्यातील काही बीच हे खास कुटुंबांसाठी योग्य मानले जातात. पालोळे बीच, मिरामार बीच आणि कोल्वा बीच हे सुरक्षित, शांत आणि स्वच्छ असल्यामुळे मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आदर्श आहेत.

३. जेवण
गोव्यातील सीफूड आणि स्थानिक पदार्थ पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. मात्र, कुटुंबासह प्रवास करताना प्रत्येकाच्या आवडी-निवडी आणि आरोग्य लक्षात घेऊन रेस्टॉरंट निवडणे गरजेचे आहे. मसालेदार किंवा जड अन्न टाळून, मुलांसाठी आणि वृद्धांसाठी साधे व पौष्टिक पर्याय निवडा. पिण्यासाठी नेहमी बाटलीबंद पाणी वापरा.

४. वाहतुकीचे नियोजन करा
गोव्यात पर्यटक बहुधा स्कूटी किंवा बाईक भाड्याने घेतात, पण कुटुंब सहलीसाठी टॅक्सी किंवा कार भाड्याने घेणे अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर ठरते. उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा एकत्र एक्सप्लोर करायचे असल्यास ड्रायव्हरसह कार बुक करणे सर्वोत्तम राहील.

५. आरोग्य आणि सुरक्षिततेची काळजी घ्या
समुद्रकिनाऱ्यावर मुलांना व वृद्धांना एकटे सोडू नका. उन्हापासून संरक्षणासाठी सनस्क्रीन, टोपी, गॉगल्स आणि हलके कॉटन कपडे घेणे आवश्यक आहे. लहान आपत्कालीन परिस्थितीसाठी फर्स्ट-एड किट सोबत ठेवणे विसरू नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'माझे घर'ला 'खो' घालण्याचा यत्न, विरोधी आमदारांना धडा शिकवा; CM प्रमोद सावंतांचे जनतेला आवाहन

Bihar Elections: "मंचावर येऊन नाचायला सांगा ते नाचतील..." विरोधी पक्ष नेते राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला

Goa Firing Case: जैतीर-उगवेत रेती उपसा करणाऱ्या कामगारांवर गोळीबार, स्थानिक बंदूकधारकांची पोलिसांकडून चाैकशी, 50 मजुरांची झडती

Goa Rain: ऐन ऑक्टोबरमध्ये राज्य 'ओलेचिंब'! महिन्यात आतापर्यंत 11.82 इंच नोंद; अनेक ठिकाणी पडझड, रस्त्यांवर पाणी

Danish Chikna Arrested: 'चिकना'चा खेळ संपला! अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या खास माणसाला गोव्यातून उचललं, पत्नीलाही ताब्यात घेतलं

SCROLL FOR NEXT