Fake Call Center Dainik Gomantak
गोवा

Fake Call Center: पार्टी, नाईटलाईफच्या नादात तरुण बनले गुन्हेगार; गोव्यातील बनावट कॉल सेंटर्सचा पर्दाफाश, परराज्यातील 50 हून अधिक तरुण ताब्यात

Goa Fake Call Center Raid: गोव्यात सध्या अशा तरुणांची संख्या वाढतेय जे केवळ विकेंड पार्ट्या, नाईटलाईफ आणि पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी तिथे नोकरी पत्करत आहेत.

Sameer Amunekar

गोव्यात सध्या अशा तरुणांची संख्या वाढतेय जे केवळ विकेंड पार्ट्या, नाईटलाईफ आणि पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी तिथे नोकरी पत्करत आहेत. मात्र, ही नोकरी कायदेशीर नसून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर फसवणूक करणाऱ्या 'फेक कॉल सेंटर्स'मधील आहे. गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, हरियाणा, नागालँड आणि मणिपूर या राज्यांतील तरुणांना या रॅकेटमध्ये ओढले जात आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या तरुणांचे वय २५ ते ३० वर्षांच्या दरम्यान आहे.

विदेशी नागरिकांना लक्ष्य करून कोट्यवधींची फसवणूक

हे बनावट कॉल सेंटर्स प्रामुख्याने अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करतात. बनावट कर्ज मंजुरी, मेडिकल बिलिंग ॲडव्हान्स आणि इतर अनेक प्रलोभने दाखवून या परदेशी नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जाते. तांत्रिक कौशल्याचा वापर करून हे तरुण विदेशी लोकांना जाळ्यात ओढतात. गेल्या वर्षभरात गोवा पोलिसांनी अशा २० हून अधिक सेंटर्सवर छापे टाकले असून ५० हून अधिक तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत.

गुजरात कनेक्शन आणि गुन्हेगारीचे जाळे

तपासादरम्यान असे दिसून आले आहे की, या बेकायदेशीर कॉल सेंटर्सचे बहुतांश चालक हे गुजरात राज्यातील आहेत. त्यांनी गोव्याच्या पर्यटन संस्कृतीचा फायदा घेऊन तरुणांना नोकरीचे आमिष दाखवले आणि या काळ्या धंद्यात उतरवले.

सध्या या रॅकेटचे मुख्य सूत्रधार कोण आहेत आणि त्यांचे जाळे कोठवर पसरले आहे, याचा सखोल तपास गोवा पोलीस करत आहेत. गोव्यातील शांतता आणि पर्यटन प्रतिमेला तडा देणाऱ्या या प्रवृत्तींविरुद्ध आता कठोर पावले उचलली जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्याकडे येणारी बस अंकोल्यात उलटली; एकाचा मृत्यू, 20 प्रवासी गंभीर जखमी; चालकाचे सुटले नियंत्रण

Stray Cattles: डिचोलीतील चौपदरी बगलमार्गावर मोकाट गुरांचा उपद्रव कायम, अपघातांचा धोका; दोन वर्षांत 15 गुरांचे बळी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ अव्वल दहातून बाहेर! 3 महिन्यांत 3.21 लाख प्रवासी कमी; विमान वाहतुकीत मंदीचे संकेत

वीरेश बोरकर यांची वाढती लोकप्रियता मनोज परब यांना खुपली? 'रिव्होल्युशनरी गोवन्स' पक्षाच्या चिंधड्या उडण्यामागचं खरं कारण काय?

Bhagur Village: इंग्लंडला धडकी भरवणारं भारतातील 'ते' खोडकर गाव, जाणून घ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'भगूर'चा थरारक इतिहास

SCROLL FOR NEXT