Goa Exit Poll Loksabha 2024 Dainik Gomantak
गोवा

Goa Exit Poll Loksabha 2024: भाऊ - धेंपे का विरियातो आणि खलप? गोव्यात कोणाचा गुलाल? एक्झिट पोलचे अंदाज समोर

Goa Exit Poll Loksabha 2024: गोव्यात यावेळी भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली असून, गोमंतकीय कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार याचे अंदाज समोर आलेत.

Pramod Yadav

Goa Exit Poll Loksabha 2024

देशात लोकसभा निवडणुकीचे सातही टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून, केंद्रात कोणाची सत्ता येणार हे ठरण्यासाठी आता केवळ दोन दिवस बाकी आहेत. दरम्यान, निकालापूर्वी विविध संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत.

गोव्यात दोन लोकसभा जागांसाठी चुरशीची लढत झाल्याचे या अंदाजातून दिसतंय. तसेच, एनडीए किंवा इंडिया आघाडीला दोन्ही जागा मिळणं अशक्य असल्याचे एक्झिट पोलचे आकडे सांगतात.

ABP C-Voter च्या अंदाजानुसार भाजपप्रणित एनडीए आघाडी गोव्यात एक किंवा दोन्ही जागा जिंकण्याची शक्यता आहे. तर, इंडिया आघाडीला गोव्यात एकच जागा जिंकता येईल. येथे एनडीएला 45 टक्के आणि इंडिया आघाडीला 46 तर इतरांना 9 टक्के मते मिळण्याची शक्यता या अंदाजातून वर्तविण्यात आलीय.

एक्सिस माय इंडिया प्रिडिकशन्स ( Axis My India Predictions) या संस्थेच्या अंदाजानुसार, गोव्यात भाजप (NDA) आणि काँग्रेस (INDIA) यांच्यात काँटे की टक्कर होताना दिसत आहे. दोघांनाही राज्यात प्रत्येकी एक - एक जागा मिळण्याची शक्यता आहे.

कोण- कोण उमेदवार आहेत रिंगणात?

भाजप (NDA)

श्रीपाद नाईक (Shripad Naik, North Goa)

पल्लवी धेंपे (Pallavi Dempo, South Goa)

काँग्रेस (INDIA Allaince)

रमाकांत खलप (Ramakant Khalap, North Goa)

विरियातो फर्नांडिस (Viriato Fernandes, South Goa)

रेव्हॉल्युशनरी गोवन्स पक्ष (RG)

मनोज परब (Manoj Parab, North Goa)

रुबर्ट परेरा (Rubert Pereira, S. Goa)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

Ranji Trophy: गोव्याची गोलंदाजी पुन्हा निष्प्रभ! बडोद्याचा 472 धावांचा डोंगर; अतीत शेठचे शतक एका धावेने हुकले

Shocking Video: नशेविरोधात लढणाऱ्या माजी कबड्डीपटूची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या, खळबळजनक व्हिडिओ व्हायरल; मेडिकल स्टोरमध्ये घडला रक्तरंजित थरार

SCROLL FOR NEXT