Excise department  Dainik Gomantak
गोवा

Excise Department: अबकारी’चा निष्क्रियपणा समोर; बेकायदा मद्यालय हटवण्यासाठी चालढकल

‘अबकारी’चा निष्क्रियपणा : बंदर कप्तानच्या तक्रारीकडे दुर्लक्ष; यॉटिंग असोसिएशन शिरजोर

गोमन्तक डिजिटल टीम

Excise Department अबकारी खात्यातील घोटाळा प्रकरण सध्या गाजत असतानाच या खात्याच्या निष्क्रियपणाचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे.

नदी परिवहन खात्याच्या मालकीच्या आणि बंदर कप्तान खात्याच्या मालमत्तेमध्ये गोवा यॉटिंग असोसिएशनला अबकारी खात्याने बेकायदा बार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याविरोधात बंदर कप्तानने पुरावे देऊनही असोसिएशनला केवळ नोटीस पाठविण्याचे काम अबकारी खात्याने केले.

वर्ष होऊनही त्याविरोधात अबकारी खाते कारवाई करत नसल्याने या बारला संरक्षण देण्यामागे कोणाचा हात आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. दोना पावला येथील या मालमत्तेत असोसिएशनला अबकारी खात्याने बार सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

वारंवार तक्रारीकडे काणाडोळा

महत्त्वाची बाब म्हणजे, नदी परिवहन खात्याने 2018 सालीही अबकारी खात्याला पत्रव्यवहार करून या बारचा परवाना रद्द करावा म्हणून विनंती केली होती. तरीही अबकारी खात्याने त्याकडे दुर्लक्ष केले.

जुलै 2022 मध्ये अबकारी खात्याने या प्रकरणाविषयी सर्व अहवाल तयार करून घेतला. नंतर अबकारी आयुक्तांनी बंदर कप्तान खाते, नदी परिवहन विभागप्रमुख आणि गोवा यॉटिंग असोसिएशनला सुनावणीसाठी बोलावले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT