Vinod Tawde: न्यायासाठी प्रसंगी भाजप विरोधातही उभे रहा!

विनोद तावडे : आंदोलन हे प्रभावी अस्त्र : ‘अभाविप’च्या अमृतमहोत्सव सोहळ्यात मार्गदर्शन
Vinod Tawde
Vinod TawdeDainik Gomantak
Published on
Updated on

Vinod Tawde न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन हे केलेच पाहिजे, मग ते सरकार भाजपचे असले तरीदेखील डगमगू नका. आंदोलन हे युवकांना आकर्षित करण्याचे एक प्रभावी अस्त्र असून त्याला गंज चढू देऊ नका, असा सडेतोड सल्ला भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांना दिला.

इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ‘अभाविप’च्या राष्ट्रीय मंत्री अंकिता पवार, गोवा प्रमुख विलास सतरकर, गोवा संयोजक धनश्री मांद्रेकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तावडे म्हणाले, आमचे विरोधक समाज माध्यमांद्वारे भारतीयत्वाच्या विरोधात प्रचार करत आहेत.

Vinod Tawde
Netravali: मैनापी धबधब्‍यावर 15 वर्षांपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती; एकाला वाचवताना दुसराही बुडाला

‘मुख्यमंत्र्यांना माझे नाव सांगा’

विद्यार्थ्यांच्या विरोधात काम करणाऱ्यांविरुद्ध आंदोलन केलेच पाहिजे, अगदी सरकार भाजपचे असले तरीही. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, श्रीपाद नाईक यांनी विरोध केल्यास त्यांना माझे नाव सांगा. कारण अभाविपने विद्यार्थ्यांच्या प्रश्नाविरुद्ध आंदोलन केले नाही, तर इतर विद्यार्थी संघटना आंदोलन करतील, असे विनोद तावडे यावेळी म्हणाले.

Vinod Tawde
Ponda News: ...अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार; शापूरवासी आक्रमक

पूर्वी ताजमहाल, आता भगवद् गीता

2014 पूर्वी पंतप्रधानांना जे विदेशी पाहुणे भेटायचे, त्यांना भेट म्हणून जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालची प्रतिकृती देण्यात येत असे;

परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेशी पाहुण्यांना संस्कृत किंवा इंग्रजी भाषेमधील श्रीमद् भगवद् गीतेची प्रत देतात. देशपातळीवरच नव्हे, तर जागतिक पातळीवरही आपल्या विचारांचा प्रभाव वाढल्याचे तावडे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com