Ponda News: ...अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार; शापूरवासी आक्रमक

सिग्नल, भुयारी मार्गासाठी शापूरवासी आक्रमक
Shahapur villagers demand underpass
Shahapur villagers demand underpassDainik Gomantak
Published on
Updated on

Shahapur villagers demand underpass फर्मागुढी-फोंडा महामार्गावरील चौपदरी रस्त्यावर शापूर येथे त्वरित सिग्नल यंत्रणा उभारा आणि भुयारीमार्ग (अंडरपास) बांधण्याची कार्यवाही करा, अशी जोरदार मागणी शापूर व लगतच्या भागातील नागरिकांनी केली.

रविवारी शेकडो नागरिकांनी काही वेळ महामार्ग रोखून धरला व ही मागणी सहा महिन्यांत पूर्ण न झाल्यास येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू, असा इशाराही दिला. यावेळी नागरिकांसमवेत आजी-माजी पंचसदस्य तसेच आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Shahapur villagers demand underpass
Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा, पणजीत पेट्रोल-डीझेल दरांत वाढ; दक्षिण गोव्यात किंमती स्थिर, जाणून घ्या आजचे दर

शापूरकडे पारंपरिक रस्ता चौपदरी बांधकामावेळी बंद केला. मात्र, आता फोंड्यातून शापूरकडे जायचे झाल्यास जीव्हीएम सर्कलला वळसा घालून जावे लागते. यामुळे वाहनचालकांना दोन किलोमीटरचा पल्ला गाठावा लागतो.

त्यामुळे इंधन व वेळ वाया जातो. सध्या शापूरकडे जाण्यासाठी ठेवलेला रस्ता अरुंद असून वाटेवर वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे वाहनचालकांच्या अडचणीत भरच पडते.

Shahapur villagers demand underpass
Deaths by Drowning in Goa: राज्यात वर्षभरात 36 जणांचा बुडून अंत; जुलै महिन्यात 6 जणांचा मृत्यू

शापूर येथील सिग्नल यंत्रणा आणि अंडरपास उभारण्यासाठी फोंडा तालुक्‍यातील चारही मंत्र्यांनी लक्ष घातले पाहिजे. येथील कदंब बसस्थानक तसेच वाहतूक कार्यालय हे चारही मतदारसंघांशी निगडित आहे. त्‍यामुळे मंत्र्यांनी बसगाडीतून प्रवास करावा, म्हणजे सर्वसामान्यांची व्यथा त्यांना कळेल. - ॲड. सुरेल तिळवे, ‘आप’ नेते, फोंडा.

Shahapur villagers demand underpass
Netravali: मैनापी धबधब्‍यावर 15 वर्षांपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती; एकाला वाचवताना दुसराही बुडाला

निवेदन सादर-

शापूर येथील वाहतूक व्यवस्थेचा घोळ दूर करण्यासाठी सिग्नल यंत्रणा उभारण्याबरोबरच अंडरपास उभारावा, यासाठी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना निवेदन दिले असल्याची माहिती नागरिकांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com