पणजी : रोजगार (Employment) नसल्याने स्थानिक परदेशाच्या (Foreign) वाटेवर आहेत, जे तग धरून आहेत त्यांना भवितव्याची (Future) चिंता भेडसावत आहे. साधनसुविधांअभावी भेडसावणाऱ्या समस्यांचे सामान्यांना काहीच वाटत नसले, तरी रोजगार आणि शेती (Farming) पाण्यात बुडाल्याची चिंता डोंगराएवढी आहे. ही व्यथा आहे सांत आद्रे मतदारसंघातील लोकांची. येत्या निवडणुकीत हाताला रोजगार आणि पोटाला भाकरी देणारा लोकप्रतिनिधी मिळावा, अशी या विधानसभा मतदारसंघातील लोकांची अपेक्षा आहे.
सांत आंद्रे हा मतदारसंघ पणजी शहराच्या अवघ्या पाच कि.मी. अंतरावरून सुरू होतो तो बांबोळी आणि आगशी ते डोंगरीपर्यंत (आजोशी) पसरला आहे. ख्रिश्चनबहुल असलेल्या या मतदारसंघात हिंदू अल्पसंख्याक आहेत. शेतीत रमणाऱ्या कुणबी, गावडा समाजाकडे जमिनी आहेत. मात्र, त्या खाजन जमिनी पाण्याखाली गेल्यामुळे त्यांना शेती करता येत नाही. अनुसुचित समाज पूर्वी मासेमारी करून गुजराण करायचा, पण, हल्ली त्यांच्यासमोरही अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. नावशीसारख्या भागात पारंपरिक मासेमारी केली जाते. पण, स्थानिक मच्छीमारांना सरकारकडून आवश्यक मदत मिळत नसल्याचे स्थानिक सांगतात.
महिला मतदार ठरवतात आमदार
या मतदारसंघातील महिला आणि पुरुष मतदारांची संख्या तोंडात बोट घालायला लावणारी आहे. मतदारसंघातील बहुतेक पुरुष परदेशात कामाला आहेत. विशेष म्हणजे या मतदारसंघातील पुरुषांकडे पोर्तुगालचे नागरिकत्व आहे. त्यामुळे बहुतांश पुरुष कायमस्वरूपी तिकडेच राहतात. काहीवेळा त्यांचे कुटुंबीयदेखील तिकडे जातात. परिणामी मतदानाची टक्केवारी अत्यंत कमी असलेला हा मतदारसंघ आहे. त्याचा फायदा आमदार सिल्वेरा यांनी घेतल्याचा आरोप होताना दिसतो.
महिलांची संख्या सर्वाधिक
मतदारसंघातील महिलांची संख्या सर्वाधिक आहे, त्याप्रमाणात त्यांच्या समस्याही अधिक आहेत. त्या सोडविण्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे, असे स्थानिक म्हणतात. साधनसुविधा उपलब्ध नाहीत. त्या निर्माण करण्यात लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. सरकारही लक्ष देत नाही. स्थानिक आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी मतदारसंघाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप होताना दिसतो. रस्ते, पाणी आणि शेतीबरोबरच रोजगाराच्या संधी हीच या मतदारसंघातील मोठी समस्या आहे.
शिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह?
मतदारसंघातील जे सुशिक्षित लोक आहेत, ते अधिकतर देशाबाहेर आहेत. काहीनी तर विदेशातील नागरिकत्व स्वीकारले आहे. तरीही त्यांची कुटुंब येथेच राहतात. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. दुसरीकडे या मतदारसंघात अनुसुचित जाती-जमातीची लोकसंख्या अधिक आहे. त्यांच्यात आजही शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. नोकऱ्याच मिळत नसतील, तर शिक्षण हवे कशाला? असे त्यांना वाटते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.