Goa: गुळेली विद्यालयाच्या शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम

पैकुळ पूल मोडल्यामुळे बंधाऱ्यावरुन पोचले विद्यार्थ्यांच्या घरी (Goa)
The teacher goes to the village of Paikul to teach the children from the dilapidated embankment, Paikul, Goa
The teacher goes to the village of Paikul to teach the children from the dilapidated embankment, Paikul, GoaPremanand Naik / Dainik Gomantak
Published on
Updated on

Guleli: गेल्या २३ जुलै रोजी आलेल्या महापुरात (Flood) पैकुळ सत्तरी (Paikul - Sattari) येथील पूल वाहून गेल्यामुळे पैकुळ भागातील गुळेली सरकारी विद्यालयातील (Govt. School) विद्यार्थ्यांचा संपर्क तुटला होता. नेटवर्क गेल्याने मुले इंटरनेट अभावी ऑनलाइन वर्गाला (Online Classes) सुध्दा मुलं मुकली. अशा स्थितीत पैकुळ गावात जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून पैकुळ पुलाजवळ असलेल्या बंधाऱ्यावर प्लेट घालून चालून जाण्याची व्यवस्था केली आहे. त्याचा आधार घेत सरकारी माध्यमिक विद्यालय गुळेलीचे मुख्याध्यापक सूरज नाईक, विज्ञान शिक्षक अजित राणे, शिल्पा गावठणकर यांनी पैकुळ गाव गाठत तेथील विद्यार्थ्यांच्या घरी भेटी दिल्या.

The teacher goes to the village of Paikul to teach the children from the dilapidated embankment, Paikul, Goa
Goa: परप्रांतीयांना गोव्यात प्रस्थापित करण्यास भाजप एव्हढीच काँग्रेसही जबाबदार

या भेटीत वह्या तपासणे, विद्यार्थ्यांकडून अभ्यास करुन घेणे, विशेषतः दहावीच्या वर्गात असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी तयारी करून घेणे, वर्कशीट देणे, त्यांना मानसिक बळ देणे असे कार्य हाती घेण्यात आले. पूल कोसळला तरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांनी दर आठवड्याला पैकुळ गावला भेट देऊन मुलांच्या शिक्षणाची सोय करण्याचे ठरवले आहे. (Goa)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com