Goa Electricity Department Recruitment 2021 Dainik Gomantak
गोवा

Goa Electricity Department Recruitment 2021: 243 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

गोवा विद्युत विभाग भरतीसाठी नोंदणी 18 ऑगस्टपासून सुरू झाली. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2021आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा विद्युत विभाग (Goa Electricity Department) भरती 2021 च्या कनिष्ठ अभियंता, इलेक्ट्रिकल आणि इतर 243 पदांसाठी साठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अर्ज करण्यास इच्छुक असणारे उमेदवार goaelectricity.gov.in या वेबसाइटवर जाऊन अधिक माहिती मिळवू शकतात. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2021 आहे.

गोवा विद्युत विभागाने ज्या पदांसाठी भरती मोहीम सुरू केली आहे त्यात कनिष्ठ अभियंता, इलेक्ट्रिकल, स्टेशन ऑपरेटर, लोअर डिव्हिजन लिपिक, वायरमन आणि मीटर रीडर या पदांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की प्रत्येक पदासाठी पात्रता निकष वेगवेगळे आहेत.

शैक्षणिक पात्रता

1) कनिष्ठ अभियंता, इलेक्ट्रिकल या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराला कोकणी भाषा अवगत असणे आवश्यक आहे.

2) मीटर रीडर पदासाठी, उमेदवाराकडे दहावी परीक्षा पास झाल्याचे किंवा इतर कोणतीही समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये आयटीआय केल्याचे प्रमाणपत्र असणे देखील अनिवार्य आहे.

3) त्याचबरोबर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कंम्प्यूटरमध्ये डिप्लोमा केलेला असावा.

4) वरील सर्व पदांसाठी उमेदवारांना कोकणी भाषा अवगत असावी.

5) विद्युत विभागाच्या अधिकृत सूचनेनुसार, कोकणी भाषेसोबतच उमेदवारांना मराठी भाषा येणेदेखील महत्वाचे आहे.

6) पात्रता निकष आणि इतर महत्त्वाच्या तपशीलांसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देणे गरजेचे आहे.

  • कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) - 56 जागा

  • स्टेशन ऑपरेटर - 18 जागा

  • निम्न विभाग लिपिक - 11 जागा

  • लाइनमन/ वायरमन - 69 जागा

  • मीटर रीडर - 79 जागा

गोवा विद्युत विभाग भरती 2021 साठी अर्ज कसा करावा

  • पहिल्यांदा अधिकृत वेबसाइट goaelectricity.gov.in वर जा .

  • उमेदवारांना प्रथम cbes.goa.gov.in वर नोंदणी करावी लागेल. तिथे आपला मेल आयडी, जन्मतारीख, अ‍ॅड केल्यानंतर उमेदवार अर्ज भरू शकतात.

  • अर्ज भरताना उमेदवारांना त्यांचा फोटो, स्वाक्षरी आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

  • ऑनलाईन फी भरल्यानंतर संदर्भासाठी त्या फॉर्मची प्रत उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे.

गोवा विद्युत विभाग भरती 2021: निवड प्रक्रिया

गोवा विद्युत विभागाकडून 243 पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामध्ये सिलेक्ट झालेल्या उमेदवारांना कौशल्य किंवा अभियोग्यता चाचणी द्यावी लागेल. मात्र काही पदांसाठी, आधी कौशल्य किंवा अभियोग्यता चाचणी द्यावी लागेल आणि त्यानंतर पात्र उमेदवारांना लेखी चाचणीसाठी बोलावले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT