Goa: दक्षिण गोव्यात होणार 42 मतदान केंद्रांची वाढ

मतदान केंद्रांची संख्या 865 वरून 907 होणार (Goa)
Meeting held by South Goa District Collector regarding Goa Assembly Election elections, on 20 August, 2021 (Goa)
Meeting held by South Goa District Collector regarding Goa Assembly Election elections, on 20 August, 2021 (Goa)Dainik Gomantak

Margao: कोविडच्या (Covide 19) पार्श्वभूमीवर मतदारांची गर्दी कमी करण्यासाठी निवडणूक आयोगाने (Election Commission) एका मतदान केंद्रासाठी 1 हजार मतदार असे प्रमाण ठरवल्यामुळे आता दक्षिण गोव्यात (South Goa) 42 मतदान केंद्रे वाढणार आहेत. दक्षिण गोव्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी असलेल्या जिल्हाधिकारी रुचिका कटयाल (Collector Ruchika Katyaal) यांनी या विषयीची माहिती दिली. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघांमध्ये (South Goa Lok Sabha constituency) एकूण 20 विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून यापूर्वी येथे एकूण मतदान केंद्रांची संख्या 865 होती. परंतु आता ती 907 एवढी वाढणार आहे.

Meeting held by South Goa District Collector regarding Goa Assembly Election elections, on 20 August, 2021 (Goa)
Goa: राजीव गांधी देशाच्या डिजीटल पर्वाचे प्रवर्तक

कटयाल यांनी आज दक्षिण गोव्यातील उपजिल्हाधिकारी, मामलेदार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या बरोबर बैठक घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. मतदार यादीत नवीन भर घालण्यासाठी 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करण्यात येणार आहे. असे जरी असले तरी नंतर नावनोंदणी केलेल्या मतदारांची अतिरिक्त यादी तयार केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Meeting held by South Goa District Collector regarding Goa Assembly Election elections, on 20 August, 2021 (Goa)
मोसम सुरू होऊन 20 दिवस उलटले तरी मासेमारीला अपेक्षित गती नाहीच

नव्या बदलाप्रमाणे वास्को येथे सर्वात जास्त म्हणजे 8 मतदान केंद्राची भर पडणार आहे. कुडचडे येथे 5, दाबोळी आणि सावर्डे येथे प्रत्येकी 4, नावेली व कुंकळ्ळी येथे प्रत्येकी 3, फोंडा, मडगाव, कुडतरी व काणकोण येथे प्रत्येकी 2 तर राहिलेल्या मतदारसंघात प्रत्येकी एका केंद्राची भर पडणार आहे. या बैठकीला गोवा फॉरवर्डच्या वतीने दुर्गादास कामत, काँग्रेसच्यावतीने आल्टीन गोम्स तर भाजपच्या वतीने नवीन पै रायकर हे उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com