Goa electricity bill penalty charges Dainik Gomantak
गोवा

Goa Electricity Bill: गोव्यात वीज बिले चक्क 50 हजार ते लाखापर्यंत..! दंड आकारणीचा फटका; लोकांमध्ये असंतोषाचे वातावरण

Goa electricity bill penalty charges: गोव्यातील वीज बिलांची रक्कम अचानक वाढू लागल्यामुळे दक्षिण गोव्यातील किनारपट्टी भागात लोकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: दंड आकारणीच्या मुद्यावरून गोव्यातील वीज बिलांची रक्कम अचानक वाढू लागल्यामुळे दक्षिण गोव्यातील किनारपट्टी भागात लोकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. सामान्य ग्राहकांप्रमाणेच पर्यटन व्यावसायिकांनीही या दरवाढीला विरोध केला आहे.

ही दरवाढ अशीच कायम राहिल्यास आमच्यावर आर्थिक संकट कोसळेल, असा दावा त्यांनी केला आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी राजकारण्यांचे उंबरठे झिजवण्यास सुरुवात केली आहे. बाणावलीत काहींना ५० हजारांहून अधिक बिले आली आहेत.

बाणावली मतदारसंघातील सुरावली व सखुभाट भागातील वीज ग्राहकांनी स्थानिक आमदार वेन्झी व्हिएगस यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या. बाणावली मतदारसंघात काहींना ५० हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंत वीज बिल आल्याचे त्यांनी सांगितले.

एवढी मोठी रक्कम लोक कशी भरतील, असा सवाल व्‍हिएगस यांनी उपस्थित केला. हे असेच सुरू राहिल्यास लोकांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

म्हणून बसतोय फटका

डिजिटल मीटरमधील नोंदींच्या आधारे अशा तफावतींचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून डिजिटल मीटरमध्ये कमाल मागणी (मॅक्सिमम डिमांड) नोंदवण्याची सुविधा उपलब्ध असल्याने ग्राहकाने किती भार वापरला याची अचूक नोंद ठेवली जाते. या नोंदींच्या आधारे मंजूर क्षमतेपेक्षा अधिक वापर आढळल्यास दरमहा दंडात्मक आकारणी केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs SA: कॅन्सरवर मात करुन 10 वर्षांनंतर संघात परतला, पण 33 चेंडू खेळूनही खातं उघडता आलं नाही; ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या नावावर नकोसा रेकॉर्ड

Jeffrey Archer: संसद ते तुरुंग अन् तिथून 'बेस्टसेलर' लेखकापर्यंत! जेफ्री आर्चर यांचा थक्क करणारा प्रवास

Nobel Peace Prize 2026: भारतीय वंशाच्या ‘नावी’ पिल्लई यांना मानाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर; न्यायासाठीचा संघर्ष ठरला यशस्वी

Arjun Tendulkar Injury: अर्जुन तेंडुलकरला दुखापतीचा फटका; गोव्याच्या रणजी सलामीच्या सामन्याला मुकणार!

Weightlifting Coach Recruitment: वेटलिफ्टिंग प्रशिक्षक निवडीला पुन्हा 'ब्रेक'; सर्वोच्च न्यायालयाकडून प्रकरण फेरसुनावणीसाठी परत

SCROLL FOR NEXT