Goa Electricity Department : गोवा वीज खात्याला 182 कोटींचा तोटा! 2558 कोटी खरेदी खर्च; फरकाची रक्कम राज्य सरकार भरणार

Goa Electricity Department Loss: वीज खरेदी व विक्रीतून २०२४-२५ आर्थिक वर्षात वीज खात्याला १८२ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. ही फरकाची रक्कम राज्य सरकार वीज खात्याला देणार आहे.
Margao Electricity Department
Margao Electricity DepartmentDainik Gomantak
Published on
Updated on

Electricity Department 2024-25 Loss : वीज खरेदी व विक्रीतून २०२४-२५ आर्थिक वर्षात वीज खात्याला १८२ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. ही फरकाची रक्कम राज्य सरकार वीज खात्याला देणार आहे.

यासाठी संयुक्त वीज नियामक आयोगाने ५ फेब्रुवारीला पणजीत; तर ६ फेब्रुवारीला मडगाव येथे जनसुनावणीचे आयोजन केले आहे. यासाठी नागरिकांकडून सुचना व आक्षेप मागवण्यात आले आहेत. वीज खात्याने २०२४-२५च्या खर्चाची छाननीसाठी (ट्रू-अप) याचिका दिली आहे. यात खर्च जास्त झाल्याने १८२ कोटींचा रुपयांचा तोटा मंजूर करा, अशी विनंती केली आहे.

हा तोटा सरकार भरणार आहे.खात्याने सादर केलेल्या याचिकेत २०२४-२५ मध्ये प्रत्यक्ष खर्च ३,१५२ कोटी रुपये दाखवण्यात आला आहे. वीज विक्रीतून मिळालेली कमाई २,९७० कोटी रुपये आहे. याचा अर्थ १८२ कोटी रुपयांची तफावत आहे.

Margao Electricity Department
Goa Electricity Meter: मुदत संपली! गोव्यात वीज खाते करणार धडक कारवाई; सोयीच्या ठिकाणी मीटर लावण्याचा विषय ऐरणीवर

ही तफावत राज्य सरकार अनुदान देऊन भरून काढणार आहे. म्हणून नवीन वीज दरवाढ मागितलेली नाही. वीज खात्याच्या अंदाजानुसार वीज खरेदीसाठी २०८२ कोटी रुपये खर्च येणार होता; मात्र प्रत्यक्षात २,५५८ कोटी रुपये खर्च आला.

Margao Electricity Department
Goa Electric Buses: 'पीएम ई-बस सेवा' योजनेतून गोव्याला मिळणार 200 आधुनिक बसेस, पर्यटन आणि वाहतूक क्षेत्राला फायदा

यामुळे खात्याला ४७६ कोटी रुपये जास्त खर्च करावे लागले. वीज वहनासाठी ४८८ कोटी रुपये खर्च आला. हा सर्व खर्च भागवण्यासाठी ३१५२ कोटी रुपयांची गरज वीज खात्याला होता; मात्र उत्पन्न २,९७० कोटी रुपयेच मिळाले. वीज खात्याने या काळात ७.२३ लाख ग्राहकांना ४९७० दशलक्ष युनिट वीज विकली (घरगुती १५३६ दशलक्ष युनिट). याआधी संयुक्त वीज नियामक आयोगाने ३.५० टक्के दरवाढ मंजूर केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com