Smart Electricity Meter: नावेली, तळावली भागात 'स्मार्ट वीज मीटर'ना विरोध; आर्थिक भार वाढण्याची भीती व्यक्त
सासष्टी: नावेलीतील रहिवाशांनी स्मार्ट वीज मीटरना विरोध दर्शवल्यानंतर आता नजकीच्या तळावली येथील रहिवाशांनीही त्यास तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.
जुने मीटर बदलून त्याजागी नवीन स्मार्ट मीटर बसवण्यामागचा सरकारचा हेतू स्पष्ट होत नाही, त्याचप्रमाणे वीज ग्राहकांवरील आर्थिक ओझे वाढणार आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
नावेली येथील ग्रामसभेत सदस्यांनी लक्षात आणून दिले होते की केवळ तीन वर्षांपूर्वीच सध्याचे मीटर बसविण्यात आले होते व सर्व मीटर चांगले आहेत. अशा परिस्थितीत ते बदलून नवीन स्मार्ट वीज मीटर बसविण्याचे प्रयोजन काय, असा प्रश्न ते उपस्थित करीत आहेत.
तळावलीतील लोकांनीही वरील भावना व्यक्त केल्या. जे मीटर चालत नाहीत ते बदलण्यास आमची हरकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. काही लोकांना वाढीव बिल देण्यात येत आहे. त्याबद्दल खबरदारी घेण्याची मागणी करण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

