दक्षिण गोव्यात (South Goa) यावेळीही भाजपच्या (BJP) तुलनेत काँग्रेससाठी (Congress) काहीसे पोषक वातावरण असले, तरी किमान आठ मतदारसंघात काँग्रेसला बंडखोरीचा (Rebellion) सामना करावा लागणार आहे. Dainik Gomantak
गोवा

Goa Election: कॉंग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या दक्षिण गोव्यात बंडोबांमुळे झळ

सांगे येथे विद्यमान आमदार प्रसाद गावकर (Prasad Gavkar) यांना काँग्रेसची (Congress) उमेदवारी मिळाल्यास तिथे अभिजित देसाई (Abhijit Desai) यांच्याकडून बंडखोरी केली जाण्‍याची शक्‍यता आहे.

दैनिक गोमन्तक

काँग्रेसला (Congress) नेहमीच मदतीचा हात देणाऱ्या दक्षिण गोव्यात (South Goa) यावेळीही भाजपच्या (BJP) तुलनेत काँग्रेससाठी काहीसे पोषक वातावरण असले, तरी किमान आठ मतदारसंघात काँग्रेसला बंडखोरीचा (Rebellion) सामना करावा लागणार आहे. काँग्रेससाठी तीच मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसला बंडखोरीचा सर्वांत अधिक त्रास सासष्टी तालुक्यात होईल. या तालुक्यातील आठपैकी चार मतदारसंघात एकापेक्षा अधिक उमेदवारांनी तिकिटावर दावा सांगितल्याने काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे.

मतविभाजनाचा धोका वाढणार...

सासष्टी तालुक्यातील नुवे आणि वेळ्ळी हे दोन मतदारसंघ असे की, तिथे काँग्रेसने कोणताही उमेदवार उभा केला तरी तो जिंकून येऊ शकतो. मात्र नुवेच्या उमेदवारीवर प्रदेश समितीचे कार्याध्यक्ष आलेक्स सिक्वेरा यांच्यासह राजू काब्राल आणि पाऊसिलीप दोरादो यांनी दावा केला आहे, तर वेळ्ळी येथे जिल्हाध्यक्ष ज्यो डायस यांच्यासह माजी आमदार बेंजामिन सिल्वा आणि सावियो डिसिल्वा यांनी दावा केल्याने या दोन्ही मतदारसंघात बंडाळी अटळ मानली जाते.

कुडतरी मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्या विरोधात माजी जिल्हा पंचायत सदस्य मोरेन रिबेलो यांनी सवतसुभा उभा केला आहे. रिबेलो यांना आतून प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा छुपा पाठिंबा असल्याचे सांगितले जाते. कुंकळ्ळी येथे युरी आलेमाव यांच्यासमोर एल्विस गोम्स यांचे पक्षांतर्गत आव्हान असून बाणावली येथे माजी आमदार मिकी पाशेको यांनी उमेदवारीवर दावा केला, तरी रॉयला फर्नांडिस यासुद्धा शर्यतीत आहेत.

केपे, कुडचडे, सांगे आणि काणकोण या चार मतदारसंघातही काँग्रेसला स्वकीयांचाच फटका अधिक बसणार आहे. केपेत एल्टन डिकॉस्ता यांना अर्जुन वेळीप यांचा विरोध सोसावा लागणार आहे. सांगे येथे विद्यमान आमदार प्रसाद गावकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाल्यास तिथे अभिजित देसाई यांच्याकडून बंडखोरी केली जाण्‍याची शक्‍यता आहे.

कुडचडे येथे बाळकृष्ण होडारकर, अमित पाटकर व हर्षद देसाई हे तीन इच्छुक रांगेत आहेत. काणकोण येथेही महादेव देसाई, चेतन देसाई आणि जनार्दन भंडारी या तिघांनी काँग्रेस उमेदवारीवर दावा केला आहे. त्यामुळे एकमताने उमेदवार नक्की करणे काँग्रेससाठी अवघड बाब ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

Rohit Sharma: ‘देशाला तुझी अजून 5 वर्षे गरज...’, रोहित शर्माच्या निवृत्तीवर भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT