Manohar Parrikar Dainik Gomantak
गोवा

Goa Election: पर्रीकरांच्या निधनानंतर पणजी ‘अनाथ’

बाबुशांना मात देण्याकरिता पर्रीकरांचे पुत्र उत्पल रिंगणात उतरले

दैनिक गोमन्तक

पणजी: पणजी ही गोवा राज्याची राजधानी असल्यामुळे तिथल्या आमदारांवर सगळ्यांचे लक्ष केंद्रीत असते. पर्रीकर हे एकेकाळी पणजीचे अनाभिषिक्त सम्राट होते. 1994 ते 2017 च्या पोटनिवडणूकीपर्यंत ते सातत्याने या मतदारसंघात निवडून यायचे. गोव्यातील भाजपाचे सर्वेसर्वा असल्यामुळे त्यांच्याभोवती एक वेगळेच ‘ग्लॅमर’ असायचे. पण 2019 झालेल्या त्यांच्या निधनानंतर पणजी ‘अनाथ’ झाल्यासारखी झाली आहे.

त्यावर्षी झालेल्या पोटनिवडणूकीत कॉग्रेसच्या बाबुश मोन्सेरात यांनी भाजपच्या सिध्दार्थ कुंकळ्ळकर यांच्यावर मात करून पणजीचे खुर्ची पटकावली. पण आता बाबुशांना मात देण्याकरिता पर्रीकरांचे पुत्र उत्पल रिंगणात उतरले आहेत. एकीकडे ‘मनी मसल’ यांचा वापर. तर दुसरीकडे तत्वांचे ‘शिंपण’ असे चित्र सध्या पणजीत दिसते आहे. खरेतर ही दोन व्यक्तीमधील लढाई न वाटता दोन प्रवृत्तीमधील लढाई वाटत आहे.

त्याचबरोबर पर्रीकरांच्या आठवणी संपविण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्या भाजपातील काही धेडाविरूध्दचा हा लढा वाटतो आहे. पर्रीकरांचा भाजप व पर्रीकरनंतरचा भाजप या दोन संस्कृतीमधील ही झुंज तर नव्हे ना असे वाटायला लागले आहे. सध्या गेल्या दोन दिवसात पणजीतले वातावरण अतिशय तप्त झाले असून उत्पल की बाबूश यावर पैजा मारल्या जात आहेत.

उत्पलांबरोबर महानगरपालिकेचे अनेक नगरसेवक फिरताना दिसत असून माजी महापौर उदय मडकईकर, भाजपाचे एकेकाळचे तालीगावचे उमेदवार दत्तप्रसाद नाईक यांनी बाबुशांना पराभूत करण्याचा चंग बांधल्याचे दिसून येते.‘आज नहीं तो कभी नही’ अशी धारणा हे लोक बाळगून मैदानात उतरलेले दिसताहेत. या दोघांच्या लढतीमुळे कॉग्रेस व आप हे काहीसे पिछाडीवर पडलेले दिसताहेत. कॉग्रेसचे एल्विस गोम्स आपल्या परीने प्रयत्न करीत असले तरी त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही.

कुंकळीतून आयात केलेले उमेदवार असा त्यांचावर शिक्का बसलेला असल्यामुळे ते लोकांच्या नजरेत भरताना दिसत नाही. त्यात परत प्रत्येकाची नजर उत्पल व बाबुशाच्या लढतीवर असल्यामुळे कॉग्रेसकडे काहीसे दुर्लक्ष व्हायला लागले आहे. आपचे वाल्मिकी नाईक हे सुपरिचित असले तरी सुध्दा सध्या बाबुश व उत्पलच्या लढतीमुळे तेही बाजूला पडल्यासारखे झाले आहेत. उत्पल व बाबुशची लढत सध्या राष्ट्रीय विषय बनला असून ज्या पर्रीकरांच्या जोरावर गोव्यात सत्ता पटकावली त्याच पर्रीकरांच्या पुत्राला संघर्ष करावा लागतो हे बघून अनेकांना चीड आल्याचे दिसते आहे.

याचा परिणाम भाजपच्या राष्ट्रीय ‘इमेज’वर होताना दिसायला लागला आहे. यामुळे पणजी बाहेरचे मतदारसुध्दा आपल्या नातेवाईकांना उत्पलना मत द्या अशी कळकळीची विनंती करताना दिसताहेत. आता ही विनंती लोक किती स्वीकारतात हे जरी निश्चित नसले तरी उत्पलनी बाबुशांना घाम काढला आहे एवढे निश्चित. तालीगावातही बाबुशांच्या पत्नीची तीच अवस्था आहे. बाबुश पत्नी जेनिफर या सध्या कोंडीत सापडल्यासारख्या झाल्या आहेत. पणजीचे माजी महापौर टोनी फर्नांडिस यांनी जेनिफरना अक्षरशः ‘नाकीनऊ’ करून सोडले आहे. त्यांना दत्तप्रसाद नाईकांची योग्य साथही मिळते आहे. जेनिफरांनी मंत्री असूनसुध्दा मतदारांना तोंड दाखविले नाही. असा त्यांच्यावर आरोप होत आहे.

तालीगावात बाबुशांची स्वतःची पुण्याई आहे यात प्रश्नच नाही. 2002 सालापासून तालीगावावर बाबुशांचेच राज्य आहे. कधी ते तर कधी पत्नी असे त्यांचे राज्य सुरू आहे. पण यावेळी त्यांना परिस्थिती विशेष अनकुल आहे असे दिसत नाही. त्यात परत पणजीत उत्पलने मोठे आव्हान उभे केल्यामुळे बाबुशांना पत्नीच्या मदतीला धावून जाणे कठीण झाले आहे. आपतर्फे सिसेलिया रॉड्रिगीश या रिंगणात असून त्यांनी नुकतेच टोनीवर काही आरोप केलेले दिसताहेत. अर्थात टोनीने त्याचे उत्तर देऊन सिसेलिया या जेनिफरना मदत करतात असा आरोप केला आहे. खरेतर सिसिलिया या बऱ्याच दिवसापासून सक्रीय आहेत.

स्कुटरवर बसून त्या अनेक गोष्टींचा प्रचार करताना दिसत होत्या. त्यामुळे त्याही ताकदवान उमेदवार ठरू शकतात. असे असले तरी खरी लढत आहे ती टोनी व जेनिफर मध्ये. टोनी एकेकाळचे बाबुश समर्थक असल्यामुळे त्यांना बाबुशांचे डावपेच चांगलेच ज्ञात आहेत. त्याचा ते उपयोग करतानाही दिसत आहेत. सध्या तरी त्यांनी प्रचाराचा धुमधडाका उडविला असून प्रचारात तरी ते जेनिफरच्या दोन हात पुढे दिसताहेत.

एकंदरीत पणजी व तालीगावच्या लढती अतिशय रोचक ठरत असून पणजीत तर ‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना जोर बाजूऐं कितना कातिल में है’ अशी अवस्था असून तालीगावात प्रस्थापिता विरूध्द नवोदित अशी लढत रंगताना दिसत आहे. आता या दोन्ही उत्कंठावर्धक लढतीचा काय निकाल लागतो त्याचे उत्तर येत्या काही दिवसातच मिळणार हे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif: भारताला शत्रू म्हटले, युद्ध जिंकल्याचा केला दावा, शेवटी शांततेसाठी मागितली भीख; पाकच्या पंतप्रधानांचा युएनमध्ये थापांचा पाऊस

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT