गोव्यातील 11,64,522 मतदार ठरवणार 301 उमेदवारांचे भवितव्य

गोव्यातील उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मते मिळवण्यासाठी लोकांची दार ठोठावण्यास सुरवात केली.
Goa Assembly election voting day
Goa Assembly election voting dayDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात मतदान (Goa Election 2022) सुरू होण्यास अवघे काही तास उरले असताना, उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मते मिळवण्यासाठी लोकांची दार ठोठावण्यास सुरवात केली. गोव्यात यावेळी बहुपक्षीय लढत होणार आहे. देशातील सर्वात लहान राज्यातील 301 उमेदवारांचे भवितव्य 11,64,522 मतदार (Voters) ठरवतील. (Goa Assembly election voting day)

मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्या निधनानंतर सत्ताधारी भाजपसाठी (BJP) ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. यावेळी सत्ताधारी भाजपची स्पर्धा आप, अडचणीत सापडलेल्या काँग्रेस (Congress) आणि टीएमसीशी (TMC) होणार आहे, जे पहिल्यांदाच गोवा राज्याच्या निवडणुकीत भाग घेत आहेत. मात्र, यावेळीही नवे खेळाडूही गोव्यात सरकार स्थापन करण्यात मोठी भूमिका बजावू शकतात, असे दिसत आहे.

Goa Assembly election voting day
मतदानाची जय्यत तयारी सुरू; अधिकार्‍यांना मतदान यंत्रांचे वाटप

दुसरीकडे, कथित 'स्टिंग ऑपरेशन'विरोधात काँग्रेस नेत्यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. ज्यामध्ये पक्षाच्या काही उमेदवारांनी निवडणुकीनंतर भाजपमध्ये येण्यासाठी पैसे घेतल्याचा दावा करण्यात आला होता. टीएमसीनेही रात्री उशिरा अशीच तक्रार नोंदवली. तर आठवडाभरापूर्वी काँग्रेसच्या 37 उमेदवारांनी आणि त्यांच्या मित्रपक्ष गोवा फॉरवर्ड पार्टीच्या तीन उमेदवारांनी निवडून आल्यास पक्षांतर करणार नाही, अशी शपथ घेतली.

त्यापुर्वी गोवा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गोव्यातील राजकीय वातावरण तापवले. त्यांनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर निशाणा साधला त्याचबरोबर जवाहरलाल नेहरूंवर गोवा मुक्तीसाठी सुमारे 15 वर्षे उशीर केल्याचा आरोप केला. पर्रीकर यांच्या निधनानंतर यावेळच्या निवडणुकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत भाजपची धुरा सांभाळत आहेत. साखळी मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढविणाऱ्या 48 वर्षीय नेत्याच्या नेतृत्वाचीही या निवडणुकीत कसोटी लागणार आहे.

2017 मध्ये प्रादेशिक मित्रपक्ष आणि अपक्ष उमेदवारांच्या मदतीने भाजपने केवळ 13 जागा जिंकूनही सरकार स्थापन केले होते. यावेळी पक्षाने '2022 मध्ये 22 प्लस' असा नारा देत स्वबळावर बहुमत मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांना भाजपने तिकीट दिले नाही आणि आता ते अपक्ष उमेदवार म्हणून पणजी मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. उत्पल पणजीत भाजपचा पराभव करण्याच्या तयारीत आहेत.

Goa Assembly election voting day
व्हॅलेंटाईन डे ठरणार गोव्यातील जनतेसाठी प्रॉमिस डे

गोव्यात आपचे नेते अरविंद केजरवील यांनी अनेक आश्वासने देऊन भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. गरज भासल्यास आप गैर-भाजप पक्षांशी निवडणूकोत्तर युती करण्यास तयार आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या I-PAC टीमसोबत गोव्यात पोहोचले. मात्र निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर ममता बॅनर्जी गोवा राज्यात सक्रिय झाल्या नाहीत. सध्या गोव्यात AAP आणि TMC या दोन्ही पक्षांना बाहेरील पक्ष असल्याच्या आरोपांना सामोरे जावे लागत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com