आठ मतदारसंघात काँग्रेसला बंडखोरीला (Congress rebel) सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
आठ मतदारसंघात काँग्रेसला बंडखोरीला (Congress rebel) सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. Dainik Gomantak
गोवा

Goa Election: बंडोबांमुळे काँग्रेसच्या वाटेत काटे

दैनिक गोमन्तक

मडगाव: काँग्रेसचा (Congress) भरवशाचा गड म्हणून ज्याकडे नेहमीच पाहिले जाते, त्या दक्षिण गोव्यात (South Goa) मतदारांचा कौल काहीसा काँग्रेसकडे झुकण्याची शक्यता असली, तरी किमान आठ मतदारसंघात काँग्रेसला बंडखोरीला (Congress rebel) सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. पक्षासाठी ही मोठी डोकेदुखी ठरू शकते. यात सासष्टीतील नुवे, कुडतरी, वेळ्ळी व कुंकळ्ळी (Kunkalli), तर इतर मतदारसंघात काणकोण, केपे, कुडचडे व सांगे अशा मतदारसंघांचा समावेश आहे.

सासष्टीतील आठ मतदारसंघात जरी एकापेक्षा अधिक इच्छुकांनी काँग्रेस उमेदवारीवर दावा केलेला असला, तरी सर्व इच्छुकांमध्ये मतैक्य घडवून आणण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. यासाठी संभाव्य उमेदवारांकडे बोलणीही सुरू झाल्याची माहिती प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली. यावेळी उमेदवार निवडण्याची आमची प्रक्रिया पारदर्शक असणार असून मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने असेल त्याची पूर्ण कल्पना संभाव्य उमेदवारांना देण्यात येईल, असे चोडणकर यांनी सांगितले.

कुंकळ्ळीत पेच कायम

वेळ्ळी आणि कुंकळ्ळी या दोन्ही मतदारसंघात काँग्रेसला पोषक स्थिती असूनही येथे बंडाळीची डोकेदुखी ठरणार आहे. वेळ्ळी येथे जिल्हा अध्यक्ष ज्यो डायस यांच्यासह माजी आमदार बेंजामिन सिल्वा आणि वेळ्ळीचे सरपंच सावियो डिसिल्वा यांनी आपला दावा सांगितला असून जर डिसिल्वा यांना काँग्रेस उमेदवारी मिळाली नाही, तर ते बंडखोरी करण्याची शक्यता आहे. कुंकळ्ळीत युरी आलेमाव की एल्विस गोम्स हा पेच काँग्रेसला सोडवावा लागेल. कुडतरी येथे काँग्रेसचे विद्यमान आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्याविरोधात काँग्रेसमधीलच एक गट माजी जिल्हा पंचायत सदस्य मोरेन रिबेलो यांना पुढे आणत असून येथे कोणालाही उमेदवारी दिली तरी दुसरा त्याच्या विरोधात निवडणूक लढविणार, ही काळ्या दगडावरची रेष समजली जाते.

सांगेत अभिजित देसाई आक्रमक

सांगे मतदारसंघात अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांना काँग्रेस पक्षात घेऊन उमेदवारी देणार हे जवळ जवळ निश्चित असल्याने अभिजित देसाई यांच्याकडून बंडखोरी होणारच हे अटळ असून काम आम्ही करायचे आणि फळे चाखायला ऐनवेळी दुसऱ्याने यावे हे आम्ही चालवून घेणार नाही, असा इशारा यापूर्वीच देसाई यांच्या समर्थकांनी दिला आहे.

कुडचडेत उमेदवारीबाबत संभ्रम

कुडचडे मतदारसंघात बाळकृष्ण होडारकर, हर्षद देसाई, आणि अमित पाटकर या तिघांनी काँग्रेस उमेदवारीवर दावा केलेला असताना माजी मंत्री रामराव देसाई यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची तयारी दर्शविल्याने काँग्रेसच्या उमेदवारीबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. केपे मतदारसंघात काँग्रेसने आपला उमेदवार म्हणून एल्टन डिकॉस्ता यांना पुढे केल्यामुळे नाराज झालेल्या राऊल परेरा यांनी यापूर्वीच आपमध्ये प्रवेश केलेला असतानाच अर्जुन वेळीप यांनी काँग्रेस उमेदवारीवर दावा केला आहे, तर काणकोण मतदारसंघातही जना भंडारी, महादेव देसाई आणि चेतन देसाई यांनी काँग्रेस उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले आहेत.

‘फॉरवर्ड’चे पत्ते अनंत चतुर्दशीनंतर...

काँग्रेस पक्षाशी युती करण्यासाठी गोवा फॉरवर्ड पक्षाने हात पुढे केला असला तरी काँग्रेसने त्याला प्रतिसाद दिलेला नाही, अशा स्थितीत गोवा फॉरवर्ड काय करणार असा प्रश्न पडला आहे. ११ दिवसांच्या गणपतीनंतर म्हणजेच अनंत चतुर्दशीनंतर ते आपले पत्ते खोलणार आहेत. युती न करता काँग्रेसने ‘एकला चलो रे’ धोरण स्वीकारल्यास मडगाव, कुंकळ्ळी, वेळ्ळी, केपे, कुडचडे व काणकोण येथे गोवा फॉरवर्ड काँग्रेसला अडचणीत आणू शकते असा अंदाज राजकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

नुवेत तिहेरी गणित; दोरादो यांचा ‘आप’शी घरोबा

नुवे मतदारसंघात बाबाशान डिसा यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपात प्रवेश केल्याने मतदार त्यांच्यावर नाराज आहेत. या मतदारसंघात आलेक्स सिक्वेरा यांच्यासह राजू काब्राल आणि पाऊसिलिप दोरादो यांनी काँग्रेस उमेदवारीवर दावा सांगितला आहे. या तिहेरी गणितात आपली डाळ शिजणार नाही, याची जाणीव असल्याने दोरादो यांनी आप पक्षाशी घरोबा वाढविला आहे. राजू काब्राल यांनी आपल्यालाच काँग्रेस उमेदवारी मिळणार अशी खात्री असल्याचे स्पष्ट करताना काही झाले, तरी आपण नुवेतून निवडणूक लढविणारच या शब्दांत इरादे स्पष्ट केले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Official Language Act: ''राजभाषा कायद्यात बदल करण्याचा कोणताही विचार नाही''; सरदेसाईंच्या आरोपावर CM स्पष्टच बोलले

CM Pramod Sawant: ''किनारी भागातील व्यवसायांच्या संरक्षणासाठी...''; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलं आश्वस्त

Bombay High Court: ''विदेशी नागरिक आपल्या देशात मंत्री कसा होऊ शकतो''; सिक्‍वेरा यांच्याविरोधात मिकी यांची हायकोर्टात याचिका

Chandel Water Treatment Plant: चांदेल जलशुद्धी प्रकल्पामध्ये ‘क्लोरीन’ गळती; अनर्थ टळला

Churchill Alemao: ''माझे मत सेक्‍युलर पार्टीलाच, पण काँग्रेसला...''; आलेमाव यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT