मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांचा आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांच्यावर निशाणा.  Dainik Gomantak
गोवा

Goa Election: 'आधी दिल्लीतील तरुणांना नोकऱ्या द्या,मग गोव्यात या'

मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांचा आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांच्यावर निशाणा.

दैनिक गोमन्तक

पणजी: आपण सत्तेत कधीच येणार नाही, त्यामुळे लोकांना मोठमोठी आश्वासने (Promises) देऊ नका त्यापेक्षा दिल्लीतील (Delhi) बेरोजगारी संपवा तेथील तरुणांना नोकऱ्या द्या आणि त्यानंतर गोव्याकडे (Goa) लक्ष द्या असे सांगत मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांच्यावर निशाणा साधला आहे.

सावंत म्हणाले, केजरीवाल गोव्यात येऊन गोवेकरांना अनेक आश्वासने देत आहेत. परंतु दिल्लीत त्यांनी किती लोकांना नोकऱ्या दिल्या ते जाहिर करावे. त्यानंतरच गोव्यातील लोकांना आश्वासने द्यावीत. केजरीवालांनी त्यांच्या सप्तसुत्रीमध्ये गोवेकरांना दिलेली आश्वासने आपल्या सरकारने या आधीच पूर्ण केली आहेत. राज्यात आयटीआय महाविद्यालयातून कौशल्य विकसाचे शिक्षण देण्यात येत आहेत. सरकाने मॉडेल करिअर सेंटरच्या माध्यमातून खासगी कंपन्यांमध्ये नोकऱ्या दिल्या आहेत. कोरोना काळात आर्थव्यवस्था बिकट असूनही सरकारने पायाभूत सेवासुविधांची उभारणी सुरुच ठेवली आहे. विद्यार्थ्यांना फीमध्ये कपात, फलोत्पादन, पशुपालन यासारख्या क्षेत्रात अनुदान देण्यात आले आहे. तसेच मोफत पाणी देखील देण्यात आल्याने जनता आमच्यावरच विश्वास ठेवेल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT