P. Chidambaram Dainik Gomantak
गोवा

Goa Election: काँग्रेस निवडणूक निरीक्षक तथा पी. चिदंबरम् गोव्यात दाखल

चिदंबरम (P. Chidambaram) यांच्यावर गोव्यातील निवडणुकीची रणनिती ठरविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: गोवा विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसने (Congresss) नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक तथा माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम् (P. Chidambaram) आज सकाळी 11 वाजता गोव्यात (Goa) दाखल झाले. दाबोळी विमानतळावर (Dabolim Airport) दाखल झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद करणे टाळले.

विचारलेल्या प्रश्नांना उत्तर न देता मी इथेच आहे. नंतर सविस्तर बोलेन, असं चिदंबरम म्हणाले. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने नियुक्त केलेले गोव्यासाठीचे निवडणूक निरीक्षक तथा माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम 25 आणि 26 ऑगस्ट रोजी गोव्यात आहेत. चिदंबरम यांच्यावर गोव्यातील निवडणुकीची रणनिती ठरविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

यावेळ दाबोळी विमानतळावर चिदंबरम यांच्या स्वागतासाठी विरोधीपक्षनेते दिगंबर कामत, लुईझीन फोलेरो,काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, संकल्प आमोणकर,माजी वीजमंत्री आलेक्स सिकेरा,माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, माजी मंत्री मिकी पाशेको व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लूईझीन फालेरो यांनी चिदंबरम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

P. Chidambaram

दोन दिवसीय दौऱ्यात चिदंबरम् काँग्रेस आमदार तसेच प्रदेश समित्यांशी चर्चा करून राज्यातील स्थितीचा आढावा घेणार आहेत. चिदंबरम् यांच्या याच दौऱ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, गोवा फॉरवर्डसोबतची युती यावरही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.प्रदेशाध्यक्ष बदल, गोवा फॉरवर्डसोबतची युती, सदस्यता नोंदणी, तळागाळापर्यंत जाऊन पक्षाला पुन्हा उभारी देणे, अंतर्गत मतभेदांना कंटाळून दूर गेलेल्यांना पुन्हा पक्षात आणणे आदी गोष्टींत आतापर्यंत तरी पक्षाला पूर्णपणे अपयशच आलेले आहे. प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी काही महिन्यांपूर्वी या गोष्टी रुळावर आणण्याचा प्रयत्न केला. पण, त्यानंतर ते दिल्लीतच अडकून पडले आहेत. आता पी. चिदंबरम गोव्यात आल्यानंतर जुने विषय तत्काळ सोडवून काँग्रेस १ सप्टेंबरपासून उमेदवार निवडीची प्रक्रियाही सुरू करणार असल्याची माहिती काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली.

P. Chidambaram

राज्य विधानसभा निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपसह, मगो, गोवा फॉरवर्ड, आम आदमी पार्टी (आप) या पक्षांनीही निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. पण, प्रदेश काँग्रेसची तयारी मात्र स्पष्टपणे दिसत नव्हती. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने काही मतदारसंघांतील नेते, कार्यकर्त्यांनीही पक्ष कार्यापासून पाठ फिरवली. या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसला पुन्हा उर्जीतावस्था मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेसने काही दिवसांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम् यांची गोव्याचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक करत निवडणुकीची रणनीती तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. त्याच अनुषंगाने ते दोन दिवसांच्या भेटीवर गोव्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT