उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक एक लाख मतांनी विजयी होतील, असा दावा गोव्याचे मुख्यमंत्री ते भाजपचे ज्येष्ठ नेते करत होते. श्रीपाद नाईक यांनी हा दावा खरा ठरवत आजवरचे सर्वात विक्रमी मताधिक्य मिळवत सहाव्यांदा विजयाला गवसणी घातली आहे.
श्रीपाद नाईक यांनी तब्बल 1,11, 353 मते मिळवत विरोधी खलपांचा धुव्वा उडवला आहे. नाईक यांना एकूण 2,50,799 मते मिळाली आहेत.
श्रीपाद नाईक यांच्या विरोधात काँग्रेसने माजी मंत्री रमाकांत खलप यांना उमेदवारी दिली होती. सुरुवातीला खलप आणि भाऊ यांच्यात काँटे की टक्कर होईल असे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्ष मतमोजणी सुरु झाली त्यावेळी भाऊ यांचे सुरुवातीपासूनचे लीड अखेरपर्यंत कायम राहिले.
विशेष म्हणजे खलप यांना कुंभारजुवा वगळता इतर कोणत्याही मतदारसंघातून आघाडी मिळू शकली नाही. खलप यांना आशा असलेल्या मांद्रे आणि पेडणे येथे देखील त्यांच्या हाती निराशाच लागली. अखेरच्या फेरीपर्यंत खलप यांना 1,39,446 मते मिळाली.
याशिवाय रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाच्या वतीने रिंगणात असलेल्या मनोज परब यांना 44,603 एवढी मते मिळाली आहेत.
श्रीपाद नाईक - 2,50,799
रमाकांत खलप - 1,39,446
मनोज परब - 44,603
नोटा - 6201
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.