South Goa Lok Sabha Result 2024: दक्षिण गोव्यात काँग्रेसच्या 'कॅप्टन'कडे मतांची श्रीमंती; भाजपाच्या उमेदवाराला पाजले पाणी

Goa Election 2024 Result: Congress Viriato Fernandes Won From North Goa Lok Sabha Constituency: दक्षिण गोव्यात अटीतटीच्या लढतीत विरियातो फर्नांडिस यांचा 14,703 मतांनी विजय झाला आहे.
Viriato Fernandes And Pallavi Dempo
Viriato Fernandes And Pallavi DempoDainik Gomantak

South Goa Lok Sabha Result 2024, Congress Viriato Fernandes Defeat BJP's Pallavi Dempo

भाजपने महिला उमेदवार देऊन प्रतिष्ठेची केलेल्या दक्षिण गोव्यातील लढतीत काँग्रेसच्या विरियातो फर्नांडिस यांचा 14,703 मतांनी विजय झाला आहे. विरियातो यांना 2,15,672 एवढी मते मिळाली असून, भाजपच्या पल्लवी धेंपे यांना 2,00,969 एवढी मते मिळाली आहेत.

पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंत विरियातो आघाडीवर होते. पल्लवी धेंपे यांनी देखील मोठ्या प्रमाणावर मते मिळवली मात्र, त्यांना विजय मिळवता आला नाही.

भाजपने पहिल्यांदाच गोव्यात महिला उमेदवार देखील अनेक इच्छुकांना नाकारले होते. धेंपे यांची गोव्यातील प्रतिष्ठा, ओळख विचारता घेता पक्ष त्यांच्या विजयाबाबत खूप सकारात्मक होता. याचवेळी काँग्रेसने देखील भाजपनंतर उमेदवाराची घोषणा केली.

काँग्रेसने विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्याऐवजी कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना उमेदवारी दिली. विरियातो यांच्या उमेदवारीचे इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी देखील स्वागत केले.

विरियातो यांच्या प्रचारासाठी गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाई, आपचे वेंझी व्हिएगस, क्रुझ सिल्वा याशिवाय इतर नेत्यांनी मोठी मेहनत घेतली.

Viriato Fernandes And Pallavi Dempo
South Goa Counting: दक्षिण गोव्यात विरियातो विजयाच्या उंबरठ्यावर, भाजपने केली फेर मतमोजणीची मागणी

अल्पसंख्याकांचा 'हात' दक्षिणेत भारी

दक्षिण गोव्यात भाजपला सहज विजय मिळेल, असे वातावरण निर्माण करण्यात आले होते. मंत्री सुदिन ढवळीकर, आमदार दिगंबर कामत, आमदार आलेक्स रेजिनाल्ड, मंत्री आलेक्स सिक्वेरा, मंत्री रवी नाईक अशा दिग्गजांनी ताकद पणाला लावूनही अल्पसंख्याक मतदारांनी काँग्रेसला दिलेला 'हात' वरचढ ठरल्याचे दिसते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com