नवेवाडे येथे उतरणी जवळ फाडण्यात आलेला होर्डिंग्ज (Goa Election 2022)
नवेवाडे येथे उतरणी जवळ फाडण्यात आलेला होर्डिंग्ज (Goa Election 2022) दैनिक गोमन्तक
गोवा

Goa Election 2022: बाप्पाकडे विजयाचा आशीर्वाद घेऊन विरोधकांचा पाप-कर्माला आरंभ

Dainik Gomantak

Goa Election 2022: पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छूकांनी वास्कोत लावण्यात आलेले गणेश चतुर्थी शुभेच्छा फलक (Ganesh Chaturthi Wishes Banner) विरोधकांकडून फाडण्याचे सत्र सुरू असून या विषयी इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली तशी वास्कोतील (Vasco) राजकीय हवा तापली असून विरोधकांनी एकमेकांवर सूड उगवण्याचे सत्र आतापासूनच सुरू केले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्वत्र आपापल्या क्षेत्रात बॅनर, होर्डिंग्स लावले आहेत. यात विविध राजकीय पक्ष संघटना तसेच नागरिकांनी जनतेला शुभेच्छा देण्यासाठी सदर बॅनर, होर्डींग्स (Banners & Hoardings Torn by Political parties) मोक्याच्या ठिकाणी लावून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात बऱ्याच ठिकाणी एकाच जागेत अनेक बॅनर्स लावण्यात आले आहे. त्यामुळे सर्वत्र होर्डिंग्स दिसत आहेत.

दरम्यान सध्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय सूड उगवण्यास विरोधकांनी सुरुवात केली आहे. येथे नवेवाडे उतरणीवर लावण्यात आलेल्या होर्डींग्स पैकी एक, नंतर हुतात्मा स्मारकाजवळ,देस्तेरो पुलावर लावण्यात आलेल्या होर्डींग्सची चिरफाड करण्यात आली आहे. आगामी काळात गुंडगिरी वाढण्याचे संकेत आहे. नवेवाडे उतरणी जवळ कॅप्टन वीरीयातो फर्नांडिस यांचा बॅनर फाडून टाकण्यात आला आहे. हुतात्मा स्मारकाजवळ नंदादीप राऊत यांचा, तर देस्तेरो ब्रीज वरील आपचा बॅनर फाडून टाकण्यात आला आहे. पुढे वातावरण बरेच तापट होणार यात शंकाच नाही. विरोधकांनी एकमेकांवर सूड उगवण्यास सुरवात केली असल्याचे दिसून येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa Today's Live Update: सांकवाळ मोदींची सभा, गर्दीत नऊ वर्षीय मुलगी बेपत्ता

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

Mormugao Port: बिर्लाचा गोव्याला रामराम, महाराष्ट्रात हलविले कामकाज; आमदार संकल्प आमोणकरांवर गंभीर आरोप

PM Modi In Goa: पीएम मोदी 150 कोटी घेऊन येणार? सभेपूर्वी पंतप्रधानावर गोवा काँग्रेसकडून प्रश्नांचा भडीमार

Amthane Dam Water : ‘आमठाणे’त अखेर पाणी; जलस्रोत खात्याकडून उपाययोजना

SCROLL FOR NEXT