CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Thivim: थिवीत MIT विद्यापीठ प्रकल्प आल्यास, स्थानिकांनाच नोकऱ्यांत प्राधान्य; मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

CM Pramod Sawant: शिक्षकांच्या नोकऱ्या सोडल्या, तर इतर सर्व प्रकारच्या नोकऱ्यांसाठी (शिक्षकेतर) स्थानिकांनाच संधी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले.

Sameer Panditrao

थिवी: गोव्याला शैक्षणिक हब बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. थिवी मतदारसंघात येणाऱ्या काळात एमआयटी विद्यापीठ प्रकल्प आल्यास परिसरातील तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. शिक्षकांच्या नोकऱ्या सोडल्या, तर इतर सर्व प्रकारच्या नोकऱ्यांसाठी (शिक्षकेतर) स्थानिकांनाच संधी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज जाहीर केले.

माडेल थिवी येथील सुशोभीकरणाच्या कामाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. सरकारच्या ‘डबल इंजिन’मधील दोन प्रमुख व्यक्ती खासदार सदानंद शेट तानावडे व मंत्री नीलकंठ हळर्णकर हे थिवी मतदारसंघातील आहेत. त्यामुळे थिवीचा चौफेर विकास केला जाणार आहे.

माडेल थिवी येथील श्री महागणपती देवस्थानच्या सभोवतालच्या परिसराचे सुशोभीकरणासाठी सरकारतर्फे पावणेतीन कोटी रुपये खर्च करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. यावेळी व्यासपीठावर पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, जिल्हा पंचायत सदस्य दीक्षा कानोळकर, पर्यटन खात्याचे संचालक केदार नाईक, देवस्थानचे अध्यक्ष घनश्याम आरोसकर उपस्थित होते.

सदानंद शेट तानावडे म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी थिवी मतदारसंघाकडे लक्ष दिल्याने लवकरच सिरसई ते अस्नोडापर्यंतचा बगलमार्ग पूर्ण होणार आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर म्हापशाहून डिचोलीला जायला फार कमी वेळ लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT