World Peace University Thivim: 195 कोटी कोणाच्या खिशात? कांदोळकरांची प्रश्नांची सरबत्ती; मुख्यमंत्र्यांना काळे बावटे दाखवण्याचे आवाहन

Kiran Kandolkar: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याची दखल घेतली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक कार्यक्रमस्थळी काळे बावटे दाखवून त्यांचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढे यावे, असे आवाहन कांदोळकर यांनी केले.
World Peace University Thivim Dispute
Kiran KandolkarDainik Gomantak
Published on
Updated on

World Peace University Thivim Dispute

थिवी: काणका-थिवी येथील जी जागा खासगी विद्यापीठासाठी लिजवर दिली आहे, ती उंच टेकडी आहे. शेकडो वर्षांपासून ही जागा गुरांना चरण्यासाठी आरक्षित केली असताना थिवीचे आमदार तथा पशुसंवर्धन खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर ही जागा वाचविण्यासाठी पुढे का येत नाहीत. ही जागा विकल्यावर गावातील जनावरे चारा कुठे खाणार? सध्या फक्त दोन लाख चौरस मीटर जागेत विद्यापीठ उभारणार; परंतु त्याव्यतिरिक्त ६ लाख ३३ हजार जागा आरक्षित केली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याची दखल घेतली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक कार्यक्रमस्थळी काळे बावटे दाखवून त्यांचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढे यावे, असे आवाहन कांदोळकर यांनी केले.

यावेळी शंकर पोळजी, रॉबर्ट कुलासो, शिवदास कांबळी, संजय बर्डे, हेमंत कांबळी, डिलीमा तसेच इतरांचीही भाषणे झाली.

कांदोळकरांचे सरकारला प्रश्‍न

कोमुनिदादने या विद्यापीठासाठी फक्त अडीचशे रुपये प्रतिचौरस मीटर किमतीत जागा कशी दिली?

येथील गावकरी थिवी कोमुनिदादला दोन ते तीन हजार रुपये प्रतिचौरस मीटरप्रमाणे पैसे द्यायला तयार असताना त्यांचे अर्ज बाजूला ठेवून या विद्यापीठासाठी इतक्या स्वस्तात जमीन का विकली?

या विद्यापीठात शिकायला येणारे विद्यार्थी जगभरातील श्रीमंतांची मुले असतील. यासाठी अशा प्रकारचे विद्यापीठ थिवीत नकोच.

World Peace University Thivim Dispute
LPG Price Hike In Goa: गॅस सिलिंडर महागला! पाच महिन्यांत झाली भरमसाठ वाढ; नवे दर जाणून घ्या

१९५ कोटी कोणाच्या खिशात?

दोनशे कोटी रुपयांची जमीन फक्त पाच कोटींना विकून वरील १९५ कोटी कोणाच्या खिशात गेले, याची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणीही किरण कांदोळकर यांनी यावेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com