पणजी: गोव्यातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवांमध्ये सहभाग वाढावा म्हणून गोवा विद्यापीठाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विद्यापीठात लवकरच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे. मे २०२५ पासून हे प्रशिक्षण सुरू होण्याची शक्यता असून, यासाठी एका बाह्य संस्थेची मदत घेतली जाणार आहे.
गोव्यातील महाविद्यालयांमध्ये पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये यूपीएससी परीक्षांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी महाविद्यालयांना सर्वेक्षण करण्यास सांगण्यात आले आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी हे प्रशिक्षण दिले जाईल. यापूर्वी गोवा शिक्षण विकास महामंडळासारख्या संस्थांनी राज्यात असे वर्ग सुरू केले होते, पण ते काही कारणास्तव बंद पडले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अलीकडेच गोव्यातील विद्यार्थ्यांमध्ये या विषयाबाबत जनजागृती नसल्याबद्दल वारंवार चिंता व्यक्त केली होती. उच्च शिक्षण प्रणालीतील शिक्षकांनी यूपीएससीद्वारे उपलब्ध असलेल्या संधींविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले होते. "यूपीएससी परीक्षा ही भारतातील सर्वात आव्हानात्मक स्पर्धा परीक्षांपैकी एक आहे.
देशभरातील उमेदवार भारतातील प्रतिष्ठित नागरी सेवांमध्ये स्थान मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत करतात," असे विद्यापीठाने मंगळवारी जाहीर केले. गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी प्रशिक्षण केंद्र असणे फायदेशीर ठरेल म्हणूनच गोवा विद्यापीठ यूपीएससी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा उपक्रम तयार करणार आहे.
"गोव्यात अशी सुविधा असणे हे इच्छुक विद्यार्थ्यांसाठी नागरी सेवकांसाठी गेम चेंजर ठरेल" असे विद्यापीठाने एका निवेदनात म्हटले आहे. "हे केवळ दर्जेदार शिक्षणातील दरी भरून काढणार नाही, तर गोव्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी सक्षम करेल," असे निवेदनात म्हटले आहे. गोव्यातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षापासून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू करावी किंवा उद्योजक व्हावे, अन्यथा ते केवळ पदवीधर बनून राहतील म्हणूनच, माझी विनंती आहे की उत्तीर्ण झालेल्या १००% विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सर्व स्पर्धा परीक्षांची किमान माहिती असावी" असे मुख्यमंत्री गेल्या महिन्यात म्हणाले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.