Goa Technical Education Dainik Gomantak
गोवा

Goa Education: तांत्रिक शिक्षण होणार स्वस्त

शुल्कात 60 % कपात गोव्यातील ही महाविद्यालये योजनेखाली

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात (Goa Education) अभियांत्रिकी, औषध निर्मितीशास्त्र, वास्तुकला (आर्किटेक्चर) पदवी, पदविका शिक्षण आता स्वस्त झाले आहे. राज्य सरकारच्या तांत्रिक शिक्षण संचालनालयाखाली (Directorate of Technical Education) येणाऱ्या अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर, तंत्रनिकेतन महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे बहुतांश शुल्क सरकारकडून (Goa Government) भरले जाणारी हीरकमहोत्सवी वर्षाचे बक्षीस देणारी योजना घोषित करण्यात आली आहे.

ही योजना प्रामुख्याने राज्यातील चार खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना वरदान ठरेल. खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वर्षाला जवजवळ एक लाख रुपये मूळ शुल्काच्या रूपाने भरावे लागत होते. ते शुल्क यंदापासून सरासरी चाळीस हजार रुपयांवर येणार आहे. शुल्क भरमसाट असल्यामुळे गेल्यावर्षी खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्याची संख्या रोडावली होती. त्या संख्येत वाढ व्हावी, त्याचा फायदा राज्याला मिळावा या हेतूने शुल्कात घट करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती तांत्रिक शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

ही महाविद्यालये योजनेखाली

राज्यातील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय, रायेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालय, पाद्रे कोन्सेसाव अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉन बॉस्को व आसगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालये या योजनेत येणार आहेत. शिवाय पीईएस व सरकारी फार्मसी महाविद्यालय, सरकारी आणि खासगी तंत्रनिकेतने, आर्किटेक्ट महाविद्यालय या योजनेखाली येणार आहेत.

विद्यार्थ्यांना लाभ

जहाजबांधणी अभियांत्रिकीतील विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ होणार आहे. नव्याने प्रवेश घेणाऱ्यांनाच नव्हे तर सध्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा फायदा मिळणे अपेक्षित असून त्यामुळे सुमारे पंधरा हजार विद्यार्थी या योजनेचे लाभधारक ठरू शकतात.

सरकार विज्ञान, कला, वाणिज्य शाखांतील महाविद्यालयांना अनुदान देते. तंत्रशिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांना तसा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शुल्काचा बराच भार सरकारने उचलण्याचे ठरवले आहे. पुढील आठवड्यात त्याविषयी तपशीलाने माहिती जाहीर केली जाईल.

- विवेक कामत, तंत्रशिक्षण संचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT