Goa News Education Policy Dainik Gomantak
गोवा

Goa Education: इयत्ता 11साठी सेमिस्टर पॅटर्न लागू होण्याची शक्यता; काय असेल अंतिम निर्णय?

Goa New Education Policy: देशातील इतर बोर्ड सेमिस्टर पॅटर्न स्वीकारत नाहीत तोपर्यंत गोवा बोर्ड देखील दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या वार्षिक पॅटर्नचे अनुसरण सुरु ठेवण्याची शक्यता आहे

Akshata Chhatre

पणजी: नवीन शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये गोवा सरकार इयत्ता 11 वी साठी सेमिस्टर पॅटर्न लागू करण्याचा विचार करत आहे. हा बदल नवीन शिक्षण धोरणाची उध्दीष्टे साधण्यासाठी करण्यात येणार आहे आणि नवीन बदलाप्रमाणे परीक्षांचे दोन भागांमध्ये विभाजन केले जाईल. या दोन्ही परीक्षांच्या गुणांवरून विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल निश्चित केला जाईल.

नवीन शैक्षणिक वर्षात मार्च आणि नोव्हेंबर महिन्यात परीक्षा घेण्यात येतील. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या परीक्षांमध्ये मल्टिपल चॉईसचे प्रश्न विचारले जातील तर मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना वर्णनात्मक उत्तरं लिहावी लागणार आहेत.

राज्यात इयत्ता 9 च्या विद्यार्थ्यांसाठी हेच धोरण लागू करण्यात आले असून, त्यांच्या ऑक्टोबर आणि मार्चमध्ये परीक्षा घेतल्या जातात. सरकारचा विश्वास आहे की अशाप्रकारच्या उपक्रमांमधून अभ्यासक्रमाची खोली अधिक चांगल्या प्रकारे तपासता येते तसेच विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे प्रवेश परीक्षांची तयारी करू शकतात.

नवीन शिक्षण धोरणानुसार आता शाळा जून महिन्याऐवजी एप्रिल महिन्यात सुरु होण्याची देखील शक्यता आहे. नेशनल एजुकेशन फ्रेमवर्कचा यंदाच्या वर्षी इयत्ता 9वी पर्यंत अवलंब करावा आणि वर्ष 2027-28 पर्यंत संपूर्ण उच्च माध्यमिक स्थरांवर म्हणजेच 12वी पर्यंत सर्वांसाठी हाच कायदा लागू केला जावा असा विचार सुरु आहे, मात्र देशातील इतर बोर्ड सेमिस्टर पॅटर्न स्वीकारत नाहीत तोपर्यंत गोवा बोर्ड देखील दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या वार्षिक पॅटर्नचे अनुसरण सुरु ठेवण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT