education news Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Education: आर्थिक अडचणींमुळे शिक्षण थांबणार नाही; ST विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सरकारचा मोठा निर्णय

ST students Goa: आर्थिक कारणांमुळे कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री शिक्षण साहाय्य योजना अधिसूचित केली आहे

Akshata Chhatre

ST Students Goa Educational Schemes

पणजी: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सर्व स्तरावर शिक्षणाची संधी मिळावी, विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत आर्थिक कारणांमुळे कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री शिक्षण साहाय्य योजना अधिसूचित केली आहे. या योजनेच्या माध्यमातून एसटी समाजातील विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क राज्य सरकार भरणार आहे. त्यामुळे त्यांच्या पालकांना परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही.

या योजनेसाठी वर्षाला सुमारे ६७ लाखांहून अधिक रक्कमेची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये असे म्हटले आहे की, अनुसुचित जमातीतील मुलांचा शाळा सोडण्याचा दर कमी करण्यासाठी विशेष यंत्रणा राबविणे गरजेचे आहे.

या योजनेचे उद्देश अनुसुचित जमातीतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती सुधारण्यासाठी मदत करणे, जे विद्यार्थी आर्थिक कारणांमुळे शाळा सोडतात ती गळती रोखणे हा आहे.

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी निकष:

  • या योजनेसाठी लाभ मिळविण्यासाठी वैध जात प्रमाणपत्र असलेल्या गोवा राज्यातील एसटी विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य देण्यात येईल.

  • अर्जदार हा गोवा राज्याचा रहिवासी असावा.

  • अर्जदार विद्यार्थ्याची शाळेत किमान ७५% हजेरी असावी.

  • या योजनेसंबंधी शाळा प्रमुखांनी विद्यार्थ्यांना माहिती द्यावी.

शैक्षणिक वर्ष एप्रिलमध्ये सुरू करण्याला मुख्यमंत्र्यांची पसंती:

यंदापासून नवीन शैक्षणिक वर्ष एप्रिलमध्ये सुरू करण्याचा निर्णय हा पालक आणि शिक्षकांच्या सोयीनुसार घेतलेला नाही. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अधिक काळ शाळेत असणे गरजेचे असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. गोवा विज्ञान केंद्रात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान सेतू कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, प्रकल्प समन्वयक मंजुळा यादव आणि मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT