Goa Education: एप्रिलपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांचं समर्थन, म्हणाले...

Pramod Sawant: यंदापासून नवीन शैक्षणिक वर्ष एप्रिलमध्ये सुरू करण्याचा निर्णय हा पालक आणि शिक्षणकांच्या सोयीनुसार घेतलेला नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलंय.
Goa Education
Goa EducationDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: यंदापासून नवीन शैक्षणिक वर्ष एप्रिलमध्ये सुरू करण्याचा निर्णय हा पालक आणि शिक्षणकांच्या सोयीनुसार घेतलेला नाही; तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अधिक काळ शाळेत असणे गरजेचं असल्यानं घेण्यात आला आहे, असं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलं.

प्रमोद सावंत आज (२८ फेब्रवारी) गोवा विज्ञान केंद्रात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान सेतू कार्यक्रमावेळी बोलत होते. यावेळी शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे व मान्यवर उपस्थित होते.

प्रमोद सावंत म्हणाले, विज्ञान सेतूच्या माध्यमातून विद्यार्थी प्रत्यक्ष प्रयोग करून संकल्पना समजून घेत आहेत. ज्यावेळी विद्यार्थ्यांची विषयासंबंधीची संकल्पना समजते, त्यावेळी खऱ्या अर्थाने त्याची वृद्धी होते.

येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व शाळांमध्ये विज्ञान सेतू हा प्रकल्प अमंलात आणण्यात येणार असल्याचं प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa CM Pramod Sawant accident help
Pramod Sawant Ganesh Idol Appeal
Goa ST Political Reservation
Double Engine Government Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com