New Education Policy  Dainik Gomantak
गोवा

Goa Education: आता शाळेत बॅग घेऊन जाण्याची गरज नाही; नवीन शिक्षण पद्धतीनुसार गोव्यात सुरु होणार 'बॅगलेस डेज'

New Education Policy Goa: नवीन शिक्षण पद्धतीच्या अंतर्गत आता विद्यार्थ्यांना जड बॅग घेऊन शाळेत जाण्याची गरज भासणार नाही

Akshata Chhatre

पणजी: गोव्यात नवीन शिक्षण पद्धतीची अंमलबजावणी लवकरच केली जाईल आणि यानुसार गोवा शिक्षण संचालनालयाने एक परिपत्रक जारी करून आगामी शैक्षणिक वर्षासाठीची योजना स्पष्ट केली आहे. नवीन शिक्षण पद्धतीच्या अंतर्गत आता विद्यार्थ्यांना जड बॅग घेऊन शाळेत जाण्याची गरज भासणार नाही.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून गोव्यात इयत्ता ६ वी आणि १०च्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० लागू केले जाईल. या नवीन शिक्षणपद्धतीनुसार इयत्ता ६वी च्या विद्यार्थ्यांसाठी, अभ्यासक्रमात १० विषयांचा समावेश असेल. गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र यांसारख्या मुख्य विषयांसह भाषेच्या शिक्षणावर भर दिला जाईल.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या आराखड्याशी जुळणारी नवीन पाठ्यपुस्तके दिली जातील. मूल्यांकन पद्धतीतही बदल होईल, ज्यात अंतर्गत मूल्यमापन (प्रोजेक्ट्स, असाइनमेंट) आणि बाह्य परीक्षांचा समावेश असेल.

इयत्ता १०वी मध्येही राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू झाल्यानंतर बदल दिसून येतील. दहावीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये बदल होणार नसला तरीही इंटरडिसिप्लिनरी स्टडीज हा नवीन विषय लागू केला जाईल. इयत्ता ६ वीची सत्र पद्धत बदलणार नाही तर इयत्ता १० वी वार्षिक परीक्षा पद्धती कायम ठेवली जाणार आहे.

माध्यमिक शाळांसाठी 'बॅगलेस डेज'

नवीन शिक्षण पद्धतीनुसार गोव्यातील माध्यमिक शाळा विद्यार्थ्यांसाठी (इयत्ता ६ वी ते ८ वी) 'विना दप्तर दिवस' ही एक अनोखी शिक्षण पद्धत सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये शाळकरी मुलांना वर्षातून १० दिवस त्यांचे जड दप्तर घेऊन येण्याची गरज भासणार नाही. विद्यार्थी विनादप्तर शाळेत येणार म्हणजे नेमके कोणते बदल करावे लागतील यावर अधिक माहिती लवकरच जारी करण्यात येणार आहे. सध्या गोवा सरकार टप्प्याटप्प्याने नवीन शिक्षण पद्धतीची अंमलबजावणी करण्याच्या प्रयत्नात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT