education updates Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Education: कॉलेजबाहेर विद्यार्थ्यांची झुंबड; रिक्त जागांसाठी एकाच वेळी दोन ठिकाणी अकरावीचे प्रवेश

Higher Secondary Admission: उच्च महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा आणि वर्ष वाया जाऊ नये म्हणून विद्यार्थी एकाच वेळी दोन ठिकाणी प्रवेश घेताना दिसतायत

Akshata Chhatre

11th admissions Goa: अलीकडेच इयत्ता १०वीचा निकाल लागलाय आणि यानंतर आता विद्यार्थी प्रवेश मिळवण्यासाठी उच्च महाविद्यालयांच्या बाहेर गर्दी करायला सुरुवात केलीये. उच्च महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा आणि वर्ष वाया जाऊ नये म्हणून विद्यार्थी एकाच वेळी दोन ठिकाणी प्रवेश घेताना दिसतायत. सध्या विद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी वाढलेल्या गर्दीमुळे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवणं कठीण होऊ लागलं आहे.

यंदाच्यावर्षी दहावीचा निकाल तीन टक्के अधिक लागल्याने अकरावीसाठी अधिक जागांवर प्रवेश मिळवला जातोय. यामुळे पणजी, म्हापसा, मडगाव यांसारख्या मुख्य शहरांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी गर्दी करतायत आणि अनेकांना प्रवेश मिळवणं कठीण झालंय.

मात्र अकरावीसाठी सर्वांना प्रवेश मिळेल असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितलं. दरवर्षी दहावीचा निकाल झाल्यानंतर काहीशी अशीच स्थिती निर्माण होते, मात्र एका उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश मिळाला नाही तर दुसऱ्या नक्कीच मिळेल असं झिंगडे म्हणालेत.

दहावीननंतर काही विद्यार्थी पॉलिटेक्निक किंवा आयटीआयला प्रवेश मिळवतात आणि यानंतर उच्च माध्यमिक विद्यालयातील त्यांचा प्रवेश रद्ध करतात, अशावेळी इतर विद्यार्थ्यांसाठी आपोआप जागा तयार होतात.

बहुतेक उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो. गोव्यात सेंट झेवियर उच्च माध्यमिक विद्यालयाप्रमाणेच धेंम्पो, जीव्हीएम यांसारख्या उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी गर्दी करतात.

मात्र या महाविद्यालयांना सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देणं सोपं होणार नसल्याने जेवढ्या जागा आहेत तेवढ्या विद्यार्थ्यांना नक्कीच प्रवेश दिला जाईल असं शैलेश झिंगडे यांनी सांगितलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT