Dainik Gomantak
गोवा

Goa EDM Zone: ईडीएमसाठी जागोजागी फिरण्याची गरज मिटणार? पर्यटन विभागाचा खास प्रस्ताव; स्थानिकांना मिळणार रोजगार

Anjuna-Vagator EDM: या प्रकल्पात एकूण १.५ लाख चौरस मीटर क्षेत्रफळावर अत्याधुनिक सुविधांच्या वापराने एक मनोरंजन क्षेत्र विकसित करण्याचा विचार सुरु आहे

Akshata Chhatre

हणजूण: गोव्यात यावर्षी पुन्हा एकदा सनबर्न संगीत महोत्सवावरून वादंग निर्माण झाला होता. यानंतर आता पर्यटन खात्याने हणजूण आणि वागातोर हिलटॉपवर एक खास मनोरंजन केंद्र विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. याच जागी पूर्वी सनबर्नचा संगीत महोत्साव पार पडायचा. या प्रकल्पात एकूण १.५ लाख चौरस मीटर क्षेत्रफळावर अत्याधुनिक सुविधांच्या वापराने एक मनोरंजन क्षेत्र विकसित करण्याचा विचार सुरु आहे.

या प्रस्तावित हबमध्ये एक प्लग-अँड-प्ले सिस्टीम असेल, ज्यामध्ये उच्च-स्तरीय ध्वनी प्रणाली, प्रगत प्रकाशयोजना, व्यावसायिकरित्या डिझाइन केलेले स्टेज आणि प्रेक्षकांसाठी नीट आसनव्यवस्था तयार केली जाणार आहे.

ही सुविधा आंतराष्ट्रीय कलाकारांना आणि कार्यक्रमांना आकर्षित करण्यात मदत करेल. परिणामी मनोरंजनाचे एक प्रमुख गंतव्यस्थान म्हणून गोव्याची ओळख निर्माण होईल.

निसर्गाचे महत्व जाणून यामध्ये शाश्वत उपक्रमांचा देखील अवलंब केला जाणार आहे. या प्रस्तावित प्रकल्पात सौर ऊर्जा संयंत्रे, पावसाचे पाणी साठवण्याची प्रणाली आणि कचरा व्यवस्थापन उपाय यासारखी पर्यावरणपूरक वैशिष्ट्ये समाविष्ट करण्याची योजना आखली गेली आहे, यामुळे गोव्यातील नैसर्गिक सौंदर्याचे जतन करत प्रस्तावित प्रकल्पाचे काम सुरु होईल.

या प्रस्तावित प्रकल्पामुळे स्थानिक होमस्टे, टॅक्सी ऑपरेटर, रेस्टॉरंट्स आणि फूड स्टॉल्ससाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील तसेच पर्यटनाच्या माध्यमातून गोव्याला आर्थिक फायदा मिळणार आहे. हा प्रस्तावित प्रकल्प सध्या नियोजनाच्या टप्प्यात आहे, प्रकल्पाची किंमत आणि अधिकृत सरकारी मान्यता मिळणं अद्याप प्रलंबित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind vs Eng 1st T20: 'वैभव'ची एन्ट्री की संजू-इशानवरच विश्वास? इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11

Pratiyuti Yog 2026: मेहनत करुन पदरी निराशा, लव्ह लाईफमध्ये दुरावा! जुलै महिन्यात ग्रहांचा महाभयंकर खेळ; 'डबल प्रतियुति योगा'मुळे 5 राशींवर ओढवणार संकट

Fake Call Centre Bust: हणजूण येथे बनावट कॉल सेंटरवर छापेमारी, क्राईम ब्रँचकडून 15 जणांना अटक; इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT