Goa DySP Sandesh Chodankar Transferred Dainik Gomantak
गोवा

Goa Police: वादग्रस्त पोलिस अधिकाऱ्याचा आणखी एक कारनामा; दादागिरी विरोधात कारवाईला दिरंगाई, पणजी मुख्यालयात केली बदली

Anjuna Property Case: अनेकदा वादग्रस्त ठरलेले म्हापसा उपविभागीय पोलिस अधिकारी तथा उपअधीक्षक संदेश चोडणकर यांची बुधवारी (19 फेब्रुवारी) तडकाफडकी पणजी मुख्यालयात बदली करण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa DySP Sandesh Chodankar Transferred Over Anjuna Property Dispute

म्हापसा: अनेकदा वादग्रस्त ठरलेले म्हापसा उपविभागीय पोलिस अधिकारी तथा उपअधीक्षक संदेश चोडणकर यांची बुधवारी (19 फेब्रुवारी) तडकाफडकी पणजी मुख्यालयात बदली करण्यात आली. पेडण्याचे उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांच्याकडे म्हापसा उपविभागीय पोलिस कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. चोडणकर यांच्या बदलीचा विषय पोलिस वर्तुळात चर्चिला जात आहे.

उपअधीक्षक संदेश चोडणकर यांची तडकाफडकी बदली

उपलब्ध माहितीनुसार, अलीकडेच हणजूण पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक प्रकरण घडले होते. त्यात घर बळकावण्याचा प्रयत्न झाला असता, कारवाई करण्यात व गुन्हा नोंदविण्यात दिरंगाई झाल्याने उपअधीक्षकांना बदलीला सामोरे जावे लागले, अशी चर्चा खात्यात सुरू आहे. येत्या जूनमध्ये संदेश चोडणकर हे पोलिस सेवेतून निवृत्त होत आहेत. गेल्या वर्षी त्यांनी म्हापसा उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून ताबा स्वीकारला होता. म्हापसा (Mapusa), हणजूण व कोलवाळ या पोलिस स्थानकाचे ते उपअधीक्षक होते.

चोडणकर हे पणजीचे पोलिस निरीक्षक असताना त्यांना निलंबनाला सामोरे जावे लागले होते. या स्थानकात एका संशयिताला पोलिसांकडून बेदम मारहाण झाली होती. त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिस कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी त्यांच्यासह त्यावेळी सेवेत असलेले पोलिसही निलंबित झाले होते. त्यातून चोडणकर सहीसलामत सुटले. त्यानंतर त्यांची नेमणूक विशेष पोलिस तपास पथकात केली होती. त्यांना विशेष अधिकार अधीक्षकांनी दिले होते.

सेवानिवृत्तीवेळी अडचणीची शक्यता

पणजीतील (Panaji) एका प्रकरणात चोडणकर यांच्यावर झालेल्या आरोपामुळे पुन्हा निलंबनाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे त्यांची कारकिर्द ही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. ऐन सेवानिवृत्तीच्या वाटेवर असताना त्यांची झालेली ही तडकाफडकी बदली त्यांना अडचणीत आणण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Goa Panchayat: पंचायत कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग, गुदिन्होंनी दिली माहिती; रेकॉर्ड पेपरलेस करण्याचा होणार प्रयत्न

विमान धावपट्टीवर पोहोचताच तांत्रिक बिघाड, प्रवाशांना उतरवून केली पुन्हा तपासणी; 'फ्लाय-91'मध्ये गोवा-पुणे प्रवाशांची गैरसोय

International Tiger Day: 2022 मध्ये गोव्यात 6 वाघ दिसले, पुढे काय..?

SCROLL FOR NEXT