Mla Carlos Ferreira Dainik Gomantak
गोवा

Goa News : राष्ट्रीय स्पर्धेवेळी बिगर गोमंतकीयांना मिळते संधी; स्थानिक खेळाडूंवर अन्याय

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, राज्यात झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांवेळी गोव्यातील संघामध्ये गोमंतकीय खेळाडूंना प्राधान्य देण्याऐवजी असलेल्या नियमानुसार ३० टक्के बिगर गोमंतकीय खेळाडूंना संधी देण्यात आली व गोव्यातील स्थानिक खेळाडूंवर अन्याय करण्यात आला.

स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. सायकलिंग असोसिएशनने सायकलिंग क्रीडा प्रकारासंदर्भात राष्ट्रीय स्पर्धांवेळी सादर केलेल्या बिलामध्ये घोटाळा असल्याने त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार कार्लुस फेरेरा यांनी आज विधानसभेत क्रीडा व युवा व्यवहार, कला व संस्कृती तसेच ग्रामीण विकास यंत्रणेच्या खात्याच्या मागण्यांवरील चर्चेवेळी केली.

इतर राज्यातील खेळाडूंना गोव्याच्या संघातून खेळवण्यात येत असल्याने गोव्यातील खेळाडूंना संधी मिळत नाही. हे बिगर गोमंतकीय खेळाडू राष्‍ट्रीय स्पर्धेसाठी खेळल्याने मिळालेल्या प्रमाणपत्रांच्या आधारे नोकऱ्या मिळवतात तर सेवेत असलेल्यांना बढतीही मिळते.

गोमंतकीय खेळाडूंना प्रशिक्षण देऊन ऐनवेळी संघात स्थान मिळत नसल्याने त्यांचे खच्चीकरण होते. त्यामुळे गोमंतकीय खेळाडूंचा खेळातील दर्जा वाढवण्यासाठी सरकारने त्यांना चांगली उपकरणे उपलब्ध करावीत तसेच चांगले प्रशिक्षकही नेमावेत.

काही क्रीडा संघटना या बैठका तसेच दौरे करतात. मात्र, खेळाचा दर्जा सुधारण्यासाठी व चांगले खेळाडू तयार करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. काही संघटनांचे पदाधिकारी वृद्ध आहेत त्यांना घरी पाठवण्याची गरज आहे. तरुण व खेळांचे ज्ञान असलेल्या युवांना संधी देण्याची गरज आहे, असे फेरेरा म्हणाले.

सरकारने चौकशी करावी

राज्यातील राष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडूला गोव्यात झालेल्या राष्‍ट्रीय स्पर्धेमध्ये स्थान देण्यात आले नव्हते. याविरुद्ध आवाज उठविल्यानंतर त्या खेळाडूला स्थान देण्यात आले. सेपॅक टॅकरो या खेळप्रकारात काही बिगर गोमंतकीयांचा संघात समावेश करण्यात आला होता. त्यांचा पत्ता गोव्यातीलच दाखविण्यात आला होता. या संघात गोमंतकीय खेळाडूंचा समावेश का करण्यात आला नाही याची सरकारने चौकशी करावी, अशी मागणी फेरेरा यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: व्‍हिडिओ व्‍हायरल करण्‍याची धमकी देणाऱ्या तरुणास अटक; असाहाय्य माय-लेकींवर अत्‍याचार

St Estevam Accident: 'सांतइस्तेव प्रकरण' पोहोचणार मंत्रालयात? नातेवाईकांचे देवालाही साकडे

Bhutani Infra: ‘मेगा प्रोजेक्ट’ चे अधिकार आता मुख्यमंत्र्यांकडे; 'भूतानी’ला भाजप सरकारचीच परवानगी असा काँग्रेसचा दावा

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT