Goa : Zuarinagar huts increases. Dainik Gomantak
गोवा

Goa : लोकसंख्या वाढीमुळे नागरी सुविधांवर ताण

औद्योगिक वसाहतक्षेत्राचे साईड इफेक्‍ट : झुआरीनगरातील झोपडपट्टी ठरतेय डोकेदुखी Goa

Mahesh Tandel, Sunil Sheth

कुठ्ठाळी : कुठ्ठाळी मतदारसंघ हा वेर्णा औद्योगिक (Verna Industries) वसाहतीला लागून असल्याने या भागात बिगर गोमंतकीय मजुरांचा (workers) भरणा वाढत आहे. वास्तव्यासाठी (residence) येथील घरमालकांनी (Home ownder) भाड्याने (Rental) देण्यासाठी खोल्या (rooms) बेकायदा (Illegal) बांधल्या (Built) असून घरमालक महिन्याकाठी (Monthly) हजारो रुपये कमवतात. पंचायतीला मात्र त्यातून एका पैशाचाही (ruppey) फायदा (benifits) नाही. लोकसंख्येच्या (Population) वाढीमुळे येथील नागरी सुविधांवर अधिक ताण पडला असून मूळ स्थानिकांना त्याचा फटका (loss) बसत आहे.

दाटीवाटीची झोपडपट्टी
झुआरीनगर येथील दाटीवाटीने वाढलेली झोपडपट्टी मतदारसंघातील सांकवाळ पंचायतीचा भाग असून तिथे ग्रामपंचायतीचे एकूण सहा प्रभाग आहेत. या बेकायदा झोपडपट्टीपासून पंचायतीला काहीच लाभ नाही. उलट कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी लाखो रुपयांचा पंचायत निधी तिथे खर्च करावा लागतो. या भागातील बेशिस्त पार्किंग व गलिच्छ वातावरण तसेच बेकायदा बांधकामांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. येथे रस्त्याच्या शेजारीच भाजी विक्रेते आपले बस्तान मांडून आहेत. ७० ते ८० टक्के घरांमध्ये शौचालयांची सुविधा नसल्याने या लोकांना उघड्यावर नैसर्गिक विधीसाठी जावे लागते. उपलब्ध शौचालयांचा योग्य वापर हे लोक करीत नसतात. त्यामुळे पठारावरून वाहत येणारे अस्‍वच्‍छ पाणी सांकवाळच्या सखल भागांमध्ये पसरते. परिणामी विहिरींचे पाणी प्रदूषित झालेले आहे.

धूळ प्रदूषणाचा त्रास
कुठ्ठाळी मतदारसंघ हा दक्षिण आणि उत्तर गोव्याला जोडणारा मतदारसंघ आहे. कुणीही या मतदारसंघातून गेल्याशिवाय उत्तर किंवा दक्षिण गोव्याचे दर्शन घेऊ शकत नाही. गेल्या काही वर्षांत सर्वांनाच नवीन झुआरी पुलाच्या कामाची झळ पोहोचली आहे. वाहनचालकांना मार्ग परिवर्तनामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. पण, कुठ्ठाळीच्या लोकांना, रस्त्याच्या बाजूला असलेल्या कुटुंबांना धूळ प्रदूषण तसेच पावसाळ्यात पाण्याचा शिरकाव घरात होत असल्याने मनस्ताप सहन करावा लागतो.

समस्‍यांच्‍या गर्तेत!
वेळसांव, कांसावली-कुयेली आरोसी येथील जनतेला रेल्वेच्या दुपदरी मार्गाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. आमदार एलिना साल्ढाणा यांनी त्यास कडाडून विरोध करीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल यांना या ठिकाणी पाहणी करण्यास भाग पाडले होते. नंतर पुढे काहीच झाले नाही. समुद्राच्या काठावर असलेल्या मच्छीमारांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कुठ्ठाळीत २०१४ पासून सुरू असलेल्या बाजार संकुलाचे काम पूर्ण होऊन काहीअंशी व्यापाऱ्यांसाठी खुला करण्यात आलेला आहे. पण, या संकुलाला जोडणारा रस्ता अरुंद आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुकाने थाटलेली आहेत.

पार्किंग समस्‍या
वाहनचालक रस्त्यावरच वाहने पार्क करीत असल्याने कोंडी होते. येथे येणाऱ्या लोकांसाठी शौचालयाची आवश्यकता आहे. नाले, ओहोळ, गटारे उपसण्याचे कोणी नाव घेत नाही. परिणामी रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत जाते. याचा पादचाऱ्यांना फटका बसतो. कुठ्ठाळी- ठाणा येथेही वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. वीज व पाणी समस्या हे विषय तर कुठ्ठाळीच्या जनतेच्या अंगवळणी पडलेले आहेत. असा एकही दिवस नाही ज्या दिवशी वीज खंडित झालेली नसेल. गेली तीस वर्षे वीजवाहिन्या आणि खांब बदललेले नाहीत.
कुठ्ठाळी येथील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्राची हद्द फार मोठी असल्याने येथे दिवसाकाठी शेकडो रुग्ण येत असतात. जागा अपुरी पडत असल्याने रुग्णांची गैरसोय होते. रात्रीच्यावेळी डॉक्टरांची येथे नियुक्ती करावी, अशी मागणी आहे.

स्‍थानिकांना डावलून प्रकल्‍प
केळशी पंचायत क्षेत्रात मिनी इंडिया पार्क हा प्रकल्प उभा राहत असून तो वादग्रस्त ठरला आहे. या प्रकल्पाला आमदार साल्ढाणा यांचा प्रखर विरोध आहे. पण संबंधित सरकारी यंत्रणा कानाडोळा करतात. कुठ्ठाळी व केळशी पंयायत कार्यक्षेत्रामध्ये वेर्णा औद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपन्या येत असल्याने वार्षिक महसुलाच्या रुपाने पंचायतीला मिळणारे शुल्क न मिळाल्याने त्याचा परिणाम पंचायतींच्या विकासकामांवर होत आहे. कुठ्ठाळीतील वाढत असलेल्या लोकसंख्येच्या तुलनेने या मतदारसंघासाठी मलनिस्सारण प्रकल्पाची नितांत आवश्यकता आहे. हा प्रकल्प काळाची गरज ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT