Goa: डिचोलीत आषाढी एकादशी उत्साहात साजरी

शांतादुर्गा मंदिरात (Shantadurga Mandir) अखंड भजनी सप्ताह संपन्न झाला. (Uninterrupted Bhajani Saptah)
Uninterrupted Bhajani Saptah at Shantadurga Mandir, Bicholim - Goa, on Tuesday, 20 July, 2021
Uninterrupted Bhajani Saptah at Shantadurga Mandir, Bicholim - Goa, on Tuesday, 20 July, 2021 Tukaram Sawant / Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली (Bicholim): विठ्ठलनामाचा गजर आणि विविध धार्मिक कार्यक्रमांसह डिचोलीत (Religious Program at Bicholim) आषाढी एकादशी (Aashadhi Ekadashi) पारंपरिक पद्धतीने भक्तीभावाने उत्साहात साजरी करण्यात आली. संचारबंदीतही भाविक भक्तांनी मनोभावे आषाढीचा उत्साह द्विगुणित केला. गावकरवाडा-डिचोली येथील श्री शांतादुर्गा मंदिरात (Shri. Shantadurga Devsthan) देवस्थान ग्रामस्थ, गावकर मंडळ ट्रस्टतर्फे आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळी देवीस अभिषेक आदी विधी पार पाडल्यानंतर देवीची सजावट करण्यात आली. भाविकांनी देवीचे दर्शन घेवून देवीचरणी आपली सेवा अर्पण केली.

Uninterrupted Bhajani Saptah at Shantadurga Mandir, Bicholim - Goa, on Tuesday, 20 July, 2021
Goa: हरि मंदिरात आषाढी एकादशी आनंदात साजरी
Uninterrupted Bhajani Saptah at Shantadurga Mandir, Bicholim - Goa, on Tuesday, 20 July, 2021
Uninterrupted Bhajani Saptah at Shantadurga Mandir, Bicholim - Goa, on Tuesday, 20 July, 2021 Tukaram Sawant / Dainik Gomantak

अखंड भजनी सप्ताह :

दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री शांतादुर्गा मंदिरात चोवीस तासांच्या अखंड भजनी सप्ताहाचे (Uninterrupted Bhajani Saptah) आयोजन करण्यात आले होते. चार चौगुले ग्रामस्थ गावकर मंडळीकडून दुपारी समई प्रज्वलित केल्यानंतर अखंड भजनी सप्ताहाला सुरवात झाली. भजन सप्ताहाला सुरवात होताच भाविक भक्तीरसात न्हाऊन गेले होते. पुरुषांसह महिला भजनी मंडळांनी भजनी सप्ताहात भाग घेतला. दरम्यान, उद्या बुधवारी (ता.21) दुपारी ग्रामस्थ गावकर, भाविक व महिला दिंडी पथकासह (Dindi squad) श्री विठ्ठलनामाच्या गजराने मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घालून मंदिरात आल्यानंतर या भजनी सप्ताहाची सांगता होणार आहे. त्यानंतर पुजाऱ्यांकडून देवीस व पंचायतन देवदेवतांना नैवेद्य, आरती, गाऱ्हाणे व तीर्थप्रसाद होणार आहे. रात्री 7.30 वा. पुराण वाचन, धुपारती आदी विधी झाल्यानंतर या उत्सवाची सांगता होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com