Large crowd gathers for funeral of three Madar brothers in Goa Dainik Gomantak
गोवा

...अन् आईने फोडला हंबरडा! अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी; तिघा मदार बंधूंवर शोकाकुल स्थितीत अंत्यविधी

Dudhsagar Drowning Madar Brothers: दूधसागर नदीत बुडून मरण पावलेल्या हिराण्णा, रामाण्णा व लक्ष्मण यांचे पार्थिव नवे वाडे येथे रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आणल्यावर त्यांच्या आईने काळीज पिळवटून टाकणारा हंबरडा फोडला.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: दूधसागर नदीत बुडून मरण पावलेल्या हिराण्णा, रामाण्णा व लक्ष्मण यांचे पार्थिव नवे वाडे येथे रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आणल्यावर त्यांच्या आईने काळीज पिळवटून टाकणारा हंबरडा फोडला. यावेळी उपस्थितांची मनेही हेलावली.

अनेकांचे डोळे पाणावले. नवे वाडेच्या चाळीसमोर काही वेळ त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवल्यावर खारीवाडा येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नवे वाडे येथील विजय साजिली याचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेण्यात येणार आहे.

दूधसागर नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या पाचपैकी चारजण शनिवारी (ता.१३) सकाळी बुडाले होते. त्यामध्ये हिराण्णा मदार (२१), रामाण्णा मदार(१९), लक्ष्मण मदार(१९) हे तीन सख्खे भाऊ मरण पावले होते. त्यापैकी रामाण्णा व लक्ष्मण हे जुळे होते.

नवे वाडे येथे राहणारा विजय साजिली(२०) हा त्यांचा मित्रही त्यांच्यासह बुडाला होता. राहुल हरिजन(२०) हा सुदैवाने बचावला. हिराण्णा, रामाण्णा, लक्ष्मण व विजय यांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आल्यावर पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.

हिराण्णा, रामाण्णा व लक्ष्मण यांचे पार्थिव घेऊन दोन शववाहिका जेव्हा नवे वाडेत आल्या. त्यांच्या घरापर्यंत शववाहिका नेणे शक्य नसल्याने त्या शववाहिका तेथील चाळीसमोर ठेवण्यात आल्या. यावेळी त्यांच्या नातेवाईक, शेजारी तसेच इतर नागरिकांनी एकच गर्दी केली होती. आपल्या तीनही मुलांचे पार्थिव पाहताच त्यांच्या आईने मोठा हंबरडा फोडला. ती या घटनेबद्दल देवाला जाब विचारत होती.

वडिलांकडून अंत्यविधी; उपस्थितांना अश्रू अनावर

खारीवाडा येथे पार्थिव आणल्यावर तेथे त्या तिघांचे वडील पारशू मदार यांनी अंत्यसंस्कार केले. तेव्हा तेथे उपस्थित नागरिकांना आपले अश्रू अनावर झाले. यावेळी विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa E Tender Process: राज्यातील काही ग्रामपंचायतींकडून ई-निविदा नियम धाब्यावर; पाच लाखांवरील टेंडर पद्धतीत गैरव्यवहार

CWG 2026 मध्ये थरारक अपघात! हाय बारवरून थेट डोक्यावर कोसळला इंग्लंडचा खेळाडू; तातडीने रुग्णालयात दाखल VIDEO

Dharmendra Pradhan Resignation: लढा अजूनही कायम! दिल्लीतील आंदोलनाच्या यशानंतर कार्यकर्त्यांचा पणजीत आनंदोत्सव

Goa Road Accidents: गोव्यात दरमहा 23 जणांचा होतोय अपघाती मृत्यू ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती, दररोज 8 रस्ते अपघातांची नोंद

VIDEO: फलंदाजीत अपयश, पण गोलंदाजीत सुपरहिट! अभिषेक शर्माने रचला इतिहास; टी-20 क्रिकेटमध्ये 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT