Dharmendra Pradhan Resignation: लढा अजूनही कायम! दिल्लीतील आंदोलनाच्या यशानंतर कार्यकर्त्यांचा पणजीत आनंदोत्सव

Azad Maidan Celebration: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, हा यशाचा पहिला टप्पा आहे. अजूनही विद्यार्थ्यांच्या इतर मागण्या पूर्ण व्हायच्या आहेत.
 Azad Maidan Celebration
Dharmendra Pradhan ResignationDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, हा यशाचा पहिला टप्पा आहे. अजूनही विद्यार्थ्यांच्या इतर मागण्या पूर्ण व्हायच्या आहेत. हा लढा अजूनही पुढे सुरू राहणार आहे, असे सांगत ‘उजवाड’ सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांसह काही सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आझाद मैदानावर आनंदोत्सव साजरा केला.

या सर्वांनी दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि निदर्शनेही केली होती. दिल्लीतील युवकांनी दाखविलेल्या एकीबद्दल या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.

 Azad Maidan Celebration
CJP Protest: "राजीनामा नाही तर मीटिंग नाही," कॉकरोच जनता पार्टीचा आक्रमक पवित्रा; तिसऱ्या चर्चेच्या फेरीपूर्वी मोदी सरकारला अल्टीमेटम

यावेळी आवेर्तीन मिरांडा, पूजन मालवणकर, सुदीप दळवी, सिसिल रॉड्रिग्ज, फ्रान्सिस कुएल्हो, अमरीन शेख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. युवकांविरोधात ‘एफआयआर’ मागे घ्यावेत अशी मागणी उपस्थित तरुणांनी केली.

‘मेलडी’ चॉकलेटचे वाटप

या आनंदोत्सवावेळी उपस्थितांनी एकमेकांना रंग लावला. त्यानंतर उपस्थितांना ‘मेलडी’ चॉकलेटचे वाटप करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश दौऱ्यात ‘मेलडी’ चॉकलेट वाटले होते. त्याच धर्तीवर यावेळी सर्वांना ‘मेलडी’ चॉकलेटचे वाटप केल्याचे उपस्थित सदस्यांनी सांगितले.

 Azad Maidan Celebration
Sonia Gandhi on Students Protest: 'विद्यार्थ्यांना शत्रू मानतं मोदी सरकार'! 'नीट' पेपरफुटीवरुन सोनिया गांधींचा हल्लाबोल

आम्ही दहशतवादी नाही, आम्हाला न्याय हवाय

‘उजवाड’च्या अमरीन शेख म्हणाल्या, की आम्ही दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी एकत्रित आलो होतो. तेव्हा आमच्याविरोधातच समाजमाध्यमांवर मोहीम उघडली. आम्हाला दहशतवादी ठरविण्यात आले. आमच्यावर नको ती टीका-टिप्पणी केली. सत्ताधारी पक्षाच्या सोशल मीडिया विभागातर्फे आमच्याविरोधात बदमानीकारक पोस्ट केल्या, हे निषेधार्ह आहे.

त्यांच्या आत्महत्यांना जबाबदार कोण?

यावेळी एक युवक म्हणाला, की ‘झेन-जी’ ही देशातील युवकांची शक्ती आहे. हा लढा असाच सुरू राहील. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे केंद्र सरकारच्या परीक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले. त्यातून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, परीक्षा रद्द झाली आणि दुसऱ्यांदा परीक्षा घ्यावी लागली; परंतु ज्या युवकांनी आत्महत्या केल्या, त्याला जबाबदार कोण, असा सवालही त्याने केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com