Goa Dubai Flights Dainik Gomantak
गोवा

Goa Dubai Flights: युद्धविरामानंतर मोठा निर्णय! बंद पडलेली गोवा–दुबई विमानसेवा 2 ऑगस्टपासून पुन्हा सुरू; एअर इंडिया एक्सप्रेसची घोषणा

Air India Express Goa Dubai: अमेरिका–इस्रायल आणि इराणमध्‍ये पेटलेल्‍या युद्धाच्‍या पार्श्वभूमीवर बंद करण्‍यात आलेली गोवा–दुबई विमानसेवा २ ऑगस्‍टपासून पुन्‍हा सुरू होणार.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: अमेरिका–इस्रायल आणि इराणमध्‍ये पेटलेल्‍या युद्धाच्‍या पार्श्वभूमीवर बंद करण्‍यात आलेली गोवा–दुबई विमानसेवा २ ऑगस्‍टपासून पुन्‍हा सुरू होणार असल्याचे एअर इंडिया एक्सप्रेसने जाहीर केले आहे.

राज्‍यातील हजारो नागरिक पर्यटन तसेच व्यावसायिक कामांसाठी दुबईला ये–जा करीत असतात. अशा प्रवाशांना दाबोळी–दुबई विमानसेवेचा मोठा फायदा मिळत होता. परंतु, अमेरिका–इस्रायल आणि इराणमध्‍ये युद्धाचा वणवा पेटल्‍याने त्‍याचा परिणाम अनेक गोष्‍टींसह विमानसेवेलाही बसला.

विविध विमान कंपन्‍यांनी गोवा तसेच भारतातून इतर काही देशांत होणारी विमानसेवा बंद केली होती. त्‍यानुसार दाबोळी–दुबई मार्गावरील सेवाही अनेक महिने बंद ठेवण्‍यात आली होती. परंतु, आता युद्धाला पूर्णविराम मिळाल्‍याने एअर इंडियाने ही सेवा पुन्हा सुरू करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT