Dry Day  Dainik Gomantak
गोवा

Dry Day On 2 Oct : गोव्यात सोमवारी ड्राय डे

राज्याच्या अबकारी खात्याकडून एक सूचना देण्यात आलीय

Ganeshprasad Gogate

Dry Day On 2 Oct गोवा राज्य पर्यटनदृष्ट्या देशविदेशात प्रसिद्ध असून ड्रिंक्स-पार्ट्यांसाठी पर्यटक आवर्जून गोव्याला भेट देतात. मात्र ऑक्टोबरच्या सुरुवातीला गोव्यात मौज-मजा करायला येणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. राज्याच्या अबकारी खात्याकडून एक सूचना देण्यात आलीय.

महात्मा गांधी जयंती दिवशी म्हणजेच 2 ऑक्टोबर 2023 रोजी राज्यातील सर्व परवानाधारक मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याचा आदेश (ड्राय डे) सरकारतर्फे देण्यात आला आहे.

पॅकबंद बाटल्यांमधून दारूची विक्री करू नये तसेच या दिवशी दारूचे सेवनही करू नये असे सांगण्यात आले आहे. ड्राय डे हा विशिष्ट दिवसांसाठी वापरला जाणारा शब्द आहे. महात्मा गांधींचा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.

या दिवशी देशभरात दारू विक्रीवर बंदी असते. तसेच प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी), स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट) आणि गांधी जयंती (2 ऑक्टोबर) यासारख्या प्रमुख राष्ट्रीय सणांप्रसंगी ड्राय डे पाळला जातो. भारतात निवडणुकांच्या काळातही कोरडा दिवसही पाळला जातो.

दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात अमली पदार्थांचे प्रमाण दुप्पट आढळून आले असून गोवा पोलीस अधिकारी किनारपट्ट्यांवर अनेक जागरुकता मोहीम राबवत आहेत.

याशिवाय सुरक्षेच्या कारणास्तव नाईट क्लबची तपासणी देखील करत आहेत. गोवा पोलिसांकडून याआधीही अवैध अमली पदार्थांविरोधात कारवाया करण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

SCROLL FOR NEXT