Mapusa Crime Dainik Gomantak
गोवा

Mapusa Crime: म्हापशात भरस्त्यात मद्यधुंद तरुणाचा हैदोस; वाहतूक रोखली, पोलिसांनी घेतलं ताब्यात

Mapusa: शहरात शनिवारी (१ फेब्रुवारी) रात्री उशिरा एका मद्यधुंद तरुणानं रस्त्यावर गोंधळ घालत वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याची घटना समोर आली आहे.

Sameer Amunekar

म्हापसा: शहरात शनिवारी (१ फेब्रुवारी) रात्री उशिरा एका मद्यधुंद तरुणानं रस्त्यावर गोंधळ घालत वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच, म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरूणाला ताब्यात घेतलं आहे.

तरुण मद्यधुंद अवस्थेत असताना रस्त्यावर गोंधळ घालत होता. सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करत होता. तरूणाच्या गोंधळामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. ही घटना शनिवारी रात्रीच्या दरम्यान घडली.

घटनेची माहिती मिळताच, म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तरुणाला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पोलिसांशीही उद्धट वर्तन केल्यानं अखेर त्याला ताब्यात घेण्यात आलं.

संबंधित तरुणाविरोधात सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालण्याचा आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून तरुणाची चौकशी सुरू असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

गोव्यात मद्यधुंद पर्यटक आणि स्थानिक तरुणांकडून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा घटनांवर अधिक कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

"7000 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह!", कर्नाटकातील सर्व शिक्षण संस्थांमध्ये अलर्ट; दोन वर्षात बाधितांचा आकडा 66 हजारांच्या पार

SCROLL FOR NEXT