Goa Drugs Seized: Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Seized: गोवा पोलिसांनी या वर्षात जप्त केले 8.38 कोटी रुपयांचे 204 किलो ड्रग्ज

अंमली पदार्थ विरोधी सेल आणि गोवा पोलिसांची कामगिरी

Akshay Nirmale

Goa Police Drugs Seized in year 2023: गोवा पोलिसांनी चालू कॅलेंडर वर्षात राज्यभरात टाकलेल्या विविध छाप्यांमधून 8 कोटी 38 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. राज्यभरात हे अंमली पदार्थ विरोधी छापे टाकले गेले होते.

यातून 197 जणांना अटक केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरूवारी दिली.

पत्रकारांशी बोलताना सावंत म्हणाले की, राज्यात अंमली पदार्थ विरोधी सेल आणि गोवा पोलिसांकडून अमली पदार्थांच्या व्यापाराविरोधात कडक कारवाई केली जाते.

01 जानेवारी 2023 ते 21 डिसेंबर 2023 पर्यंतच्या विविध छाप्यांमध्ये 197 आरोपींना अटक करण्यात आली असून 8.38 कोटी रुपयांचे 204 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची उत्तर गोव्यातील कुंडई औद्योगिक वसाहतीमध्ये उभारण्यात आलेल्या बायोमेडिकल वेस्ट फॅसिलिटीमध्ये विल्हेवाट लावण्यात आली.

मी स्वतः मीडिया व्यावसायिकांच्या टीमसह अशा प्रकारच्या विल्हेवाटीचे वैयक्तिकरित्या निरीक्षण केले होते. अमली पदार्थ विरोधी सेलने राज्यात कार्यरत असलेल्या ड्रग्ज तस्करांवर कडक नजर ठेवली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT