Goa Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: राज्यात ड्रग्ज तस्करीत वाढ; विदेशी नागरिकांसह स्थानिक युवकांचा सहभाग

Goa Drugs Case: 2020 ते 2023 या चार वर्षांत 563 गुन्हे पोलिस खात्यात नोंद

Ganeshprasad Gogate

Goa Drugs Case: राज्यात वाढत्या अपघातांप्रमाणेच ड्रग्ज तस्करीचे प्रमाणही वाढत असून सनबर्न, 31 फर्स्ट सारख्या पार्ट्यांचा आश्रय घेऊन हे तस्कर खुलेमाल तस्करी करताना दिसत आहेत.

मागील 3 वर्षात तर राज्यतील ड्रग्ज तस्करीचे प्रमाण भलतेच वाढले असून ड्रग्ज तस्करीचे गुन्हे आता राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहेत.

या ड्रग्जच्या जाळ्यात युवकांना ओढले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

2020 ते 2023 या चार वर्षांत 563 गुन्हे पोलिस खात्यात नोंद झाल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

गोवा हे जागतिक पर्यटनस्थळ असल्याने राज्यात देश-विदेशातील पर्यटक येत असतात. त्यामुळे या ड्रग्ज गुन्हेगारीत फक्त राज्यातीलच नाही तर विदेशी नागरिकांचाही सहभाग आहे.

या 563 ड्रग्ज गुन्हेगारीत 108 गुन्हेगार हे विदेशी नागरिक आहेत तर 370 गुन्हेगार हे राज्याबाहेरील आहेत, तर 186 स्थानिक नागरिकांची ड्रग्ज गुन्हेगारीत नोंद झाली आहे. यात युवकांची संख्या जास्त असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील बहुतांश ड्रग्ज तस्करीचे गुन्हे हे किनारी भागात घडत आहेत. तसेच यात विदेशी नागरिकांचा मोठा सहभाग असून या नागरिकांमध्ये यात रशियन, आफ्रिकन नागरिकांचा जास्त सहभाग आहे.

तसेच अन्य काही देशी नागरिकांचाही सहभाग आहे. मागील काही वर्षांपासून सायबर क्राइम वाढत आहेत. फसवणूक, तसेच इतर सोशल मीडियावर महिलांचे फोटो वापरून बदनामी करणे, प्रसिद्ध व्यक्तींचे फोटो वापरून त्यांची बदनामी करण्याचे गुन्हे वाढत चालले आहेत.

सायबर पोलिसांना, असे गुन्हेगार पकडण्यात अडचणी येत आहेत. यामुळे अनेक लोकांची बदनामी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT