Theft Case Dainik Gomantak
गोवा

Dona Paula Theft Case: ‘हनिट्रॅप’च्या जाळ्यात अलगद अडकला चोर, पश्‍चिम बंगालमध्ये आवळल्या मुसक्या

बंगल्यातील 50 लाखांच्या चोरीचा उलगडा

गोमन्तक डिजिटल टीम

Dona Paula Theft Case दोना पावला येथील एका डॉक्टराच्या बंगल्यातील चोरीप्रकरणी पणजी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चोराच्या पश्‍चिम बंगालमध्ये मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी एका मुलीच्या नावाने इंस्टाग्राम अकाऊंट उघडून (हनिट्रॅप) लावलेल्या जाळ्यात संशयित चोर सुरेदर छेत्री (31) हा अलगद अडकला आणि पोलिसांची मोहीम फत्ते झाली.

सुरेदरने या बंगल्यातून डायमंड, सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम मिळून सुमारे 50 लाखांची चोरी केली होती. त्यापैकी त्याने विकलेले काही डायमंड आणि दागिने मुंबईतील एका ज्वेलरीमधून जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.

गेल्या महिन्यात 31 जुलै रोजी मार्वेल कॉलनी, दोना पावला येथील बंद असलेल्या बंगल्यात दिवसाढवळ्या चोरी झाली होती. याप्रकरणी बंगल्याच्या मालकाने तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

अन् गोत्यात आला

तपास सुरू असतानाच या परिसरात चेहरा कापडाने झाकलेला व सायकलवरून वारंवार ये-जा करताना एक तरुण आढळला. त्याचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे मागोवा घेतला असता, तो पणजीतील एका कॅसिनोमध्ये नंतर फोंड्याच्या दिशेने जाताना दिसला.

ज्या ठिकाणी त्याने भेटी दिल्या, तेथे त्याने बनावट नाव व पत्ता असलेले ओळखपत्र दिले होते. मात्र, तो वारंवार मोबाईल क्रमांकही बदलत असल्याने त्याचा ठावठिकाणा पोलिसांना कळत नव्हता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

SCROLL FOR NEXT