Goa Dog Bite:  Dainik Gomantak
गोवा

Goa Dog Bite: कामुर्लीत 10 वर्षांच्या मुलीला चावला रॉटविलर कुत्रा

कुत्र्याच्या 2 मालकांवर गुन्हा दाखल

Akshay Nirmale

Goa Dog Bite: कामुर्ली येथील 10 वर्षाच्या मुलीचा चावा घेणाऱ्या रॉटविलर कुत्र्याच्या मालकांवर कोलवाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सिद्धार्थ उर्फ रोशन श्रीपाद खोर्जुवेकर (वय 29) आणि अनिकेत श्रीपाद खोर्जुवेकर (वय 26) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत पांडुरंग खोर्जुवेकर यांनी तक्रार दिली होती. रविवारी (ता. 17) ही घटना घडली होती.

सिद्धार्थ आणि अनिकेत हा दोघेही सख्खे भाऊ आहेत. कातुर्ली, कामुर्ली येथे दोघेही स्वतंत्र राहतात. त्यांच्या मालकीचा रॉटविलर कुत्रा आहे. पैकी हा अनिकेत हा या कुत्र्याचा केअरटेकर आहे.

दरम्यान, या दोघाही बंधुंनी या कुत्र्याची मालकी पांडुरंग खोर्जुवेकर यांच्याकडे सोपवली होती. सध्याही हा कुत्रा पांडुरंग यांच्याकडेच आहे. त्यांनी त्या कुत्र्याची काळजी घेण्याबाबत ठरले होते.

रविवारी दुपारी पावणे बाराच्या सुमारास सिद्धार्थ आणि अनिकेत यांनी या कुत्र्याला मोकळेच सोडले होते. त्यामुळे हा कुत्रा थेट बाहेर गेला आणि तक्रारदार पांडुरंग खोर्जुवेकर यांच्या दहा वर्षाच्या मुलीला तो चावला. ही मुलगी तिच्या घराबाहेर होती.

कुत्रा चावल्याने ती जखमी झाली. तसेच या कुत्र्यामुळे इतरांनाही धोका निर्माण झाला. यावरून कुत्र्याचे मालक असलेल्या सिद्धार्थ आणि अनिकेत खोर्जुवेकर या बंधुंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goan Food Culture: अळवा, वाल अन् पालक भाजीला 'वडी'ची फोडणी! कोंकणी खाद्यसंस्कृतीचा चेहरा बदलणारा एक पारंपारिक पदार्थ

Goa Education: अनुदानित शाळांतील विद्यार्थी संख्‍येत घट; विनाअनुदानित शाळांतील संख्‍येत मात्र सातत्‍याने होतेय वाढ

'Telegram'ला 15 दिवसांचा अल्टिमेटम! चित्रपट आणि OTT कंटेंटप्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका, पायरसीविरोधात मोठं पाऊल

Goa Solar Scheme: राज्याची सौर अनुदान योजना रखडली; शेकडो अर्जदार प्रतीक्षेत, 3 वर्षे मुदतवाढीची अधिसूचना अद्याप नाही

Goa Education: 3 वर्षांपासून निधीअभावी अडचणीत असलेल्या 'बाल हक्क आयोगा'ला अखेर सरकारी अनुदान; 'गोमन्तक'च्या वृत्ताची प्रशासनाकडून तातडीने दखल

SCROLL FOR NEXT