GST Dainik Gomantak
गोवा

जीएसटी दर कमी करण्‍याची मागणी: गोवा जिल्हा पंचायत सदस्य

सध्या सरकारने कामाच्या मॅन्यूअल खुल्या निविदेसाठी 5 लाख मर्यादा ठेवली

दैनिक गोमन्तक

मडगाव: वाढीव जीएसटी दरामुळे जारी केलेल्या निविदांची कामे घ्यायला ठेकेदार पुढे येत नाहीत असे सांगून काल झालेल्या दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या बैठकीत सदस्यांनी नव्या सरकारने हे दर कमी करावेत अशी मागणी केली.

जिल्हा पंचायतीची ही द्विमासिक बैठक होती व तीत सदस्यांनी सरकारने एक तर हे दर कमी करावेत वा खुली मॅन्यूएल निविदा मर्यादा दहा लाख करावी असे सुचविले. सध्या सरकारने कामाच्या मॅन्यूअल खुल्या निविदेसाठी 5 लाख मर्यादा ठेवली आहे.

या प्रस्तावावर प्रदीर्घ चर्चा झाली. त्यात सदस्यांनी सांगितले की, नव्या जीएसटी दरांमुळे निविदा काढलेली कामे सुरू करायला ठेकेदार संकोच करतात. रायमधील सदस्य डॉम्‍निक गावकर यांनी हा ठराव मांडला होता. अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर यांनी सदस्यांना विकासकामांचे कागदोपत्री काम लवकर पूर्ण करून ते निविदा प्रक्रियेसाठी प्रस्ताव कार्यालयात सादर करण्याचे आवाहन केले. 15 व्या वित्त आयोगाने मंजूर केलेला 8.75 कोटींचा निधी आलेला असून तो त्वरित खर्च करायला हवा. यावेळी बोरी पुलाचे काम त्वरित हाती घ्यावे अशी मागणी करणारा ठरावही संमत करण्‍यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT