येत्या एक-दोन दिवसात धरणातून जलविसर्ग अटळ असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शापोरा नदीकाठी भिती पसरली आहे.  Dainik Gomantak
गोवा

Goa: तिलारी धरणातून पुढील दोन दिवसांत पाण्याचा विसर्ग अटळ

113.20 मीटर ही धरणातील जलसाठ्याची पातळी आहे. रविवारपर्यंत या धरणातील जलसाठ्याची पातळी 109 मीटरहून अधिक वाढली आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: मुसळधार पावसामुळे (Rain) महाराष्ट्रातील तिलारी धरणाची (Tilari Dam) पातळी वाढत असली, तरी अद्याप जलसाठ्याने धोक्याची पातळी (Level of danger) गाठली नसल्याची माहिती मिळाली आहे. धरण प्रकल्प अधिकारीणीने अद्याप धोक्याचा 'अलर्ट' (Danger 'alert') दिला नसला, तरी पावसाचा जोर पाहता धरणातून मोठ्या प्रमाणात जलविसर्गाचा धोका वाढला आहे. रविवार प्रमाणेच उद्यापर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या एक-दोन दिवसात धरणातून जलविसर्ग अटळ असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शापोरा नदीकाठी भिती पसरली आहे.

113.20 मीटर ही धरणातील जलसाठ्याची पातळी आहे. रविवारपर्यंत या धरणातील जलसाठ्याची पातळी 109 मीटरहून अधिक वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणातील पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी आणि जलविसर्गाचा धोका टाळण्यासाठी धरणातील अतिरिक्त पाणी बाहेर सोडण्याचा निर्णय धरण प्रकल्प अधिकारीणीने घेतला असल्याची माहिती मिळाली आहे.

शापोरा तुडूंब

तिळारी धरणात जलविसर्ग सुरु झाला की अतिरिक्त पाणी शापोरा नदीत सोडण्यात येते. त्यामुळे शापोरा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढते. सद्यस्थितीत मुसळधार पावसामुळे साळ, मेणकूरेहून वाहणारी शापोरा नदी तुडूंब भरली आहे. त्यामुळे नदीकाठी भिती पसरली आहे. मागील जून महिन्यात 'तिळारी'तील पाण्याने शिखर स्तर गाठल्यानंतर पाणी बाहेर गोव्याच्या दिशेने वाहणाऱ्या शापोरा नदीत वाहू लागले होते. जलनिसर्गाचा धोका ओळखून त्यावेळी शापोरा नदीकाठच्या जनतेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT