Disaster Management: Dainik Gomantak
गोवा

Goa Disaster Management: 'त्या दोन्ही' निवारा केंद्राचा 'असा' केला जातो वापर; पंचायतीला होतेय महसूल प्राप्ती

सध्या या केंद्रांची देखभालीची जबाबदारी ही स्थानिक पंचायतींवर सोपविली गेली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Disaster Management चक्रीवादळे, महापूर, त्सुनामी, कोविड, भूंकप यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी राज्य सरकारकडून बार्देशात दोन ठिकाणी म्हणजे, साळगाव व पर्वरी परिसरात बहुद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्रे उभारली गेली.

सध्या या केंद्रांची देखभालीची जबाबदारी ही स्थानिक पंचायतींवर सोपविली गेली आहे. दोन्ही प्रकल्प उभारून सुमारे दीड वर्ष उलटले असून सुदैवाने तशी आपत्ती उद्भवली नसल्याने अद्याप तरी याचा वापर झालेला नाही.

विशेष म्हणजे, गेल्या महिन्यांत पिळर्णमधील बुहद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्र हे सामाजिक मेळाव्यासाठी भाड्यावर दिलेले आहे. जेणेकरून, केंद्र वापरात राहील, असा त्यामागचा हेतू होता. तर दुसरे केंद्र हे पेन्ह-दी-फ्रान्स पंचायत परिक्षेत्रात आहे.

जवळपास 3 कोटी रुपये खर्च करून पिळर्णमधील बहुद्देशीय निवारा केंद्राचे लोकार्पण डिसेंबर 2021 मध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले होते. जागतिक बँकेच्या निधीतून हा प्रकल्प उभारला गेला आहे.

साळगाव पठरावर पिळर्ण अग्निशमन केंद्राशेजारी 300 चौरस मीटर क्षेत्रात बांधलेला तळमजला अधिक दोन मजली ही इमारत आहे. चक्रीवादळ, त्सुनामी, पूर, कोविड, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी निवारा केंद्राचा वापर केला जाणार आहे.

केंद्रात 100 लोकांना सामावून घेण्याची व्यवस्था आहे. साळगाव पठार उंचावर असल्याने यास्थळी हे निवारा केंद्र उभारले गेले आहे.

सध्या पिळर्णमधील चक्रीवादळ निवारा केंद्राच्या देखभालीची जबाबदारी ही स्थानिक साळगाव पंचायतीची असून, देखभाल समितीच्या अध्यक्षपदी हे साळगाव सरपंच आहेत.

वापरामुळे स्वच्छता!

गेल्या जूनमध्ये साळगाव पंचायतीने हे केंद्र वाढदिवस साजरा करण्यासाठी भाड्यावर दिलेले. जेणेकरून, केंद्राचा वापर व त्यातून महसूल प्राप्ती होईल आणि हे पैसे देखभालीसाठी वापरता येणार हा त्यामागचा उद्देश होता.

यापुढेही अशाप्रकारे निवारा केंद्र कार्यक्रम किंवा प्रशिक्षणासाठी देता येऊ शकतो. कारण, निवारा केंद्र वापरात राहिल्यास त्याची निगराणी व स्वच्छता टिकून राहते, असे पंचायतीला वाटते.

असे आहे निवारा केंद्र!

  • पिळर्ण परिसरातील बहुद्देशीय निवारा केंद्रात अपंग व्यक्तींसाठी (महिला व पुरुष) वेगळी व्यवस्था म्हणजे खोल्या आहेत. तिथे पलंग तसेच त्यावर गाद्या घातलेल्या आहेत. विशेष म्हणजे, या गाद्या नव्याकोऱ्या आहेत. ज्यांचे प्लास्टिकही अद्याप निघालेले नाही.

  • पहिल्या मजल्यावर लॉबी व दुसऱ्या मजल्यावर एक मोठा सभागृह आहे. प्रत्येक मजल्यावर स्वच्छतागृहे व स्टोअर रुमची सोय आहे.

    याशिवाय तळमजला व पहिल्या मजल्यावर प्रशस्त स्वयंपाकघरे आहेत. खुर्च्च्या, जनरेटर, वॉटर प्युरिफायरची सुविधा या केंद्रात आहे. केंद्रस्थळी पाण्याची सोयदेखील आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT